पाणी पुरवठा योजना आ.शिरीष दादा मित्र परिवाराच्या हाती दिल्यास तीन दिवसाआड पाणीपुरवठा करून दाखविणार

आ.शिरीष चौधरींचे सत्ताधारीना आव्हान,नियोजना अभावी पाणी कपात केल्याचा केला आरोप..

अमळनेर(प्रतिनिधी)जळोद व कलाली येथील तापीच्या डोहातील जलपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे कारण पुढे करीत येथील नगरपरिषदेने दि २ मे पासून शहराचा पाणीपुरवठा तीन ऐवजी सहा दिवसाआड करण्याचा निर्णय घेतला आहे,परंतु सत्ताधारीनी केवळ न प ची पाणीपुरवठा योजना आ शिरिषदादा मित्र परिवार आघाडीच्या हाती दिल्यास निश्चितपणे एवढ्याच जलसाठ्यावर तीन दिवसाआडच पाणीपुरवठा करून दाखवू असे जाहीर आव्हान आ शिरीष चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिले आहे.
तापी नदीवरील जळोद व कलाली येथील डोहात न प पाणी पुरवठा योजना कार्यरत असून ही जळोद ही मुख्य तर कलाली ही तातडीची योजना आहे,मात्र संत सखाराम महाराज संस्थांनचा यात्रोत्सव नजिक असतानाच पालिकेने अचानक कमी जलसाठा शिल्लक असल्याचे कारण पुढे करून पाणी पुरवठा सहा दिवसाआड करण्याचा निर्णय जाहीर केला,यामुळे अमळनेर जनता धास्तावली असताना आ शिरीष चौधरी यांनी लेखी पत्रांवये सत्ताधारीवर तोफ डागली असून सत्ताधारी मंडळींची अपूर्ण इच्छाशक्ती ढिसाळ नियोजनामुळेच जनता तहानलेली असल्याचा आरोप केला आहे,सदर पत्रात अधिक खुलासा करताना आ चौधरींनी म्हटले आहे की ज्यावेळी आ शिरिषदादा मित्र परिवार आघाडीची सत्ता पालिकेवर होती त्यावेळी देखील उन्हाळ्यात पाण्याची अशीच परिस्थिती कायम होती मात्र आपली जनता तहानलेली राहू नये हीच इच्छाशक्ती मनात असल्याने व तंत्रशुद्ध नियोजन असल्याने संपूर्ण उन्हाळाभर तीन दिवसाआड सुरळीत पाणी पुरवठा करण्यात आम्ही यशस्वी ठरलो होतो व विशेष म्हणजे केवळ एक उन्हाळा नव्हे तर संपूर्ण अडीच वर्षे पाणी पुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आम्ही येऊ दिला नाही.खरेतर जनता जनार्दनाच्या आशीर्वादानेच हे सारे शक्य झाले होते.खरे तर पाणी प्रश्नात आम्हाला राजकारण मुळीच करायचे नाही परंतु भोळी भाबली जनता या रणरणत्या उन्हात तहानलेली राहू नये हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे,अजूनही सत्ताधारी मंडळीनी योग्य नियोजन केल्यास पाणी कपात करण्याची कोणतीही आवश्यकता भासणार नाही आहे.
आम्ही सत्तेत असताना जळोद येथील जलपातळी अतिशय खालावल्याने सुरवातीला आम्ही हतनूर च्या आवर्तनाचे योग्य नियोजन करून त्यावर पाणी पुरवठा सुरळीत ठेवला,आवर्तनाचे पाणीही संपल्यावर गंगापुरी डोहातून चारी खोदून पाणी आणले त्यावर देखील अनेक दिवस निघाले,हा पर्याय देखील संपल्यावर पुन्हा आवर्तन मिळणे शक्य नव्हते तेव्हा करायचे काय हा प्रश्न असताना आमचे बंधू हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रविंद्र चौधरी यांच्या संकल्पनेतून हिरा उद्योगच्या सीएसआर फंडातून एक दोन नव्हे तर तब्बल बारा बोअरवेल जळोद पंपावर केल्या आणि परमेश्वराची कृपा म्हणजे सगळ्या बोअरवेल मधून पाण्याची गंगाच अवतरली यामुळे गरजेनुसार पाणी उपलब्द होऊन शहराचा पाणीपुरवठा तीन दिवसाआडच सुरळीत राहिला.एकीकडे पाणीपुरवठा सुरळीत असताना देखील आम्ही स्वस्थ बसलो नाहीत, कलाली येथील डोहातून 8 कोटींची तातडीची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी शासन दरबारी प्रचंड तगादा लावून मुख्यमंत्र्यांकडुन ती मंजूर करून घेतली व लागलीच निधी उपलब्द करून अल्पवधीत योजना कार्यान्वित देखील केली यामुळे कायमचा मोठा आधार पाणी पुरवठा योजनेला मिळून भविष्यात कधीही पाण्याची अडचण निर्माण होणार नाही अशीच तरतूद आमच्या काळात निश्चितपणे झालेली आहे.
आम्ही जनतेच्या हितासाठी पाण्याचे विविध स्रोत निर्माण केले असले तरी सत्ताधारीच्या नेत्यांना आमच्या स्रोत ची देखील एलर्जी असल्याने ते सुरवातीपासूनच या स्रोतांकडे दुर्लक्ष करून पाण्यामध्येही दुजाभाव आणि राजकारण करीत आहेत,जे बोअरवेल तापीत पाण्याचा थेंब नसताना संजीवनी ठरलेत त्या बोअरवेल कडे यांनी पूर्णपणे दुर्लक्ष करून बंद केल्या,कोणताही मेंटेनन्स यांनी ठेवला नाही तसेंच एवढी मोठी आठ कोटींची कलाली डोहातील योजना जी संपूर्ण उन्हाळ्याचा भार निश्चितपणे पैलू शकते तिलाही यांनी नजरेआड केले,भ्रष्टाचार आणि कमिशनच्या लालसेने आधीन झालेले सत्ताधारी पाणीपुरवठा 6 दिवसाआड करून गोर गरीब जनतेची अक्षरशः पिडावणूक करीत आहे,सर्वत्र दुष्काळ परिस्थिती लक्षात घेता जर आधी पासून योग्य नियोजन केले असते तर आज जनतेचे एवढे हाल झाले नसते,खरेतर याच कलाली डोहावरून आज अमळनेर शहरात पाणी पुरवठा होत आहे,प्रत्यक्षात त्या काळात या माजी आमदारांनीच तातडीच्या या पाणी पुरवठा योजनेला प्रचंड विरोध केला होता, एवढेच नव्हे तर सदरच्या योजनेबद्दल खोट्या तक्रारी करून योजनाच रद्द करण्यात यावी असे शासनास कळविले होते,आणि आज तेच आम्ही केलेल्या कामावर चक्क फुशारकी मारीत आहेत,कलाली डोहात जर यांनी मध्यभागी तारांकरी मोटार टाकली असती तर आज देखील भरपूर पाण्याचा उपसा हे करू शकले असते,मात्र नियोजन शून्य कारभार कसा असतो त्याचे जिवंत उद्धहरण म्हणजे अमळनेर नगर परिषदच आहे असे म्हणायला मुळीच हरकत नाही, साधी एक मोटार सुद्धा यांनी अतिरिक्त घेऊन ठेवली नाही जेणेकरून तातडीने 1 मोटार नादुरुस्त झाली तर दुसरी अतिरिक्त मोटार उपयोगात आणता येईल,स्वच्छ भारत अभियान आणि इतर ठेकेदाराकडून हफ्ते चे घेण्या चे नियोजन यांना मात्र योग्या जमते,आशा बेफिकीर आणि स्वार्थी कारभाराचा परिणाम म्हणूनच तीन दिवसाआड होणारा पाणी पुरवठा आज सहा दिवसाआड करण्याची दुर्देवी वेळ यांच्यावर आलेली आहे.
परंतु माझी एकच विनंती यांना आहे की राजकारण करायचे ते आमच्याशी करा,आजपर्यंत ज्या नगराध्यक्षानी प्रतिनिधित्व केले त्यांनी जनतेच्या हितासाठी काही चांगल्या गोष्टी दिल्या असल्यास त्याचा कोणतीही संकोचिंत वृत्ती न ठेवता उपयोग करून घ्यावा,आणि महत्वाचे म्हणजे पाणी पुरवठा योजना आमच्या मित्र मंडळाकडे सोपविण्याबाबत नक्कीच गंभीर्याने विचार यांनी करावा असे आवाहन आ शिरीष चौधरी यांनी या पत्राद्वारे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *