अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर प्रतिपंढरपूर येथिल सद्गुरू संत सखाराम महाराज संस्थानचे गादीपती प्रसाद महाराज यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत आज सकाळी ९:३० वाजता अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बोरीनदी पात्रात यात्रोत्सवाचे स्तंभरोपण व ध्वजारोहण करण्यात आले.
परंपरेनुसार देव परीवारातील अभय देव यांचे हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिताताई वाघ, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, जिल्हा न्यायाधिश श्री पांडे, पोलिस उपअधीक्षक राजेंद्र ससाणे, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश सदगीर,विद्युत मंडळाचे हेमंत ठाकूर, उपस्थित होते. आज पहाटे वाडी संस्थांमध्ये विठ्ठल-रुख्ममाईची विशेष पूजा करण्यात आली. तसेच पांडुरंगाला सोन्याची पगडी चढविण्यात आली.
आज पहाटे वाडी संस्थांमध्ये विठ्ठल-रुकमाईची विशेष पूजा करण्यात आली.तसेच पांडुरंगाला सोन्याची पगडी चढविण्यात आली.
यानंतर वाडी मंदिराच्या सभामंडपातून संस्थानचे अकरावे गादी पुरुष ह.भ.प.प्रसाद महाराज हे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बोरीनदीच्या पात्रात ढोल,वाजंत्री, ताश्याच्या,गजरात संत सखाराम महाराजांच्या जयघोषात आले. सुरवातीला समाधी मंदिराच्या मागे अन्नपूर्णा स्वयंपाक घराच्या पुरातन जागेवर विधिवत पूजा करून अन्नपूर्णा खांब रोपण करण्यात आले तदनंतर समाधी मंदिरांच्या पुढे अभय देव , सुनील देव ,जय देव , केशव पुराणिक , सारंग पाठक यांच्या हस्ते स्तंभाची पूजा करून स्तंभ रोपण करण्यात आले.
यावेळी जयदेव, केशव पुराणिक,चारुदत्त जोशी, सारंग पाठक, मिलिंद उपासनी यांनी पौराहित्य केले. प्रल्हाद महाराजांच्या समाधी मंदिरा कळसावर ध्वज भास्कर नामदेव भावसार, प्रशांत भावसार, यांनी भगवा ध्वज लावण्यात आला.
या दरम्यान प्रसाद महाराजांची पूजा करून सर्वाना गंध लावण्यात आला प्रसाद महाराजांनी समाधीस्थळासमोरील सभामंडपात उपस्थित मान्यवरांना महाराजांच्या हस्ते मानाचे नारळ व खळीसाखरेचा प्रसाद देण्यात आला.
यावेळी जिल्हा न्यायाधीश राजीव पांडे , न्या विक्रम आव्हाड , न्या एच ए वाणी , न्या अतुल कुलकर्णी , आमदार शिरीष चौधरी , आमदार स्मिता वाघ , माजी आमदार साहेबराव पाटील , नगराध्यक्ष पुष्पलता पाटील , भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ , राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील , प्रांताधिकारी सीमा आहिरे , डी वाय एस पी राजेंद्र ससाणे , तहसीलदार ज्योती देवरे , मुख्याधिकारी शोभा बाविस्कर , ए.पी. आय. प्रकाश सदगीर , माजी नगराध्यक्ष विनोद पाटील , वीज मंडळाचे हेमंत ठाकूर , संकेत मलठाने , संजय चौधरी यांचे श्रीफळ व प्रसाद व कार्यक्रम निमंत्रण पत्रिका देऊन स्वागत केले. खान्देश शिक्षण चे विश्वस्त वसुंधरा लांडगे, आदी विविध पक्षाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी,पत्रकार,न.पा. कर्मचारी,सह हरी भिका वाणी , भाऊसाहेब देशमुख , महेश कोठावदे , नितीन निळे , संजय कौतीक पाटील , शीतल देशमुख , अभिजित भांडारकर ,सरपंच सुरेश पाटील श्याम आहिरे , विक्रांत पाटील , प्रताप साळी , चंदू साळी यांच्यासह प्रताप साळी शहरातील प्रमुख भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.