सुजाण मंगल कार्यालयात एका कुटुंबाला बेदम मारहाण महिलेच्या गळ्यातील पोत लांबविली पोलिसात दरोडा दंगलीचा गुन्हा..

अमळनेर (प्रतिनिधी) मागील कुरापत काढून सुमारे १० जणांनी एक कुटुंबाला मारहाण करून महिलेच्या गळ्यातील मंगळपोत ओढून नेल्याची घटना ४ रोजी रात्री साडे दहा ते १२ वाजेदरम्यान सुजाण मंगल कार्यालयात घडली पोलिसात दरोडा व दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जनाबाई देविदास बैसाने ही महिला ४ रोजी रात्री नातेवाईक बालालासाहेब मांगो बिऱ्हाडे यांच्या मुलाच्या हळदीच्या निमिताने कुटुंबसह चारचाकी क्र एम एच ३९, १९१७ व मोटरसायकल क्र एम एच १९, ९८९० मध्ये सुजाण मंगल कार्यालयात गेले असता जेठाणीचे भाचे समाधान गभा बिऱ्हाडे , राहुल गाभा बिऱ्हाडे , अजय अनिल बिऱ्हाडे , सतीश अनिल बिऱ्हाडे,गौतम मंगल बिऱ्हाडे , मुकेश सीताराम बैसने सर्व रा अमळनेर यांनी काही एक कारण नसताना मागील कुरापत काढून मुलगा , सून नातूला लाठ्या काठ्यानी मारहाण करणे सुरू केले महिलेच्या डोक्यात मारून पळल्याने महिला बेशुद्ध झाली अजय बिऱ्हाडे याने गळ्यातील मंगल पोत पळवली अशी लेखी तक्रार पोलिसात केल्यावरून वरील सर्व आरोपींविरुद्ध भादवी ३९५ , ३२४, १४३, १४७, १४९, ५०६ , ३२३, ३७ (१)(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास ए.पी.आय.प्रकाश सदगीर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *