द्विशताब्दी महोत्सवात धगधगत्या तप्त ऊन्हातही दररोज हजारो भाविकांची रिघ ; उद्या विज बचतीचा संदेश देणारा दिपोत्सव….

अमळनेर (प्रतिनिधि)अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानच्या द्विशताब्दी महोत्सव कार्यक्रमाला धगधगत्या तप्त ऊन्हातही दररोज हजारो भाविकांची रिघ लागली असून कर्नाटक गूजराथ सह महाराष्ट्रातील भाविक गेल्या ४ दिवसापासून या महोत्सवात सहभागी झाले आहे. विशेष म्हणजे कूठलाही पोलीस बंदोबस्त न घेता हा सोहळा पार पडत आहे.

सूमारे ४००हून अधिक स्वयंसेवक आपली सेवा देत असल्याची माहिती संत सखाराम महाराज संस्थानचे गाधीपती प.पु प्रसाद महाराज यांनी पत्रकार परिषदेत आज दिली दि २२ ला जगदगूरू शंकराचार्यांच्या ऊपस्थितीत संत संमेलन व भव्य शोभा यात्रेने  या कार्यक्रमाला प्रारंभ झाला दि २८ ला मनू महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे निसर्गाच्या अवकृपेने ऊभारलेला मंडप कोसळला होता मात्र कार्यक्रमाच्या ४८ तास आधि पून्हा जैसे थे तयार करण्यात आला ३००० यजमान बसतील एव्हढ्या यज्ञकूंड मंडपातील कूंड ७०ते८० मूस्लीम कारागिरांनी तयार केले होते मंडप कोसळल्या नंतर एकही कूंडाला धक्का लागला नाही हि भगवंताची कृपा आहे हा यज्ञ पेटविण्यासाठी काडीला काडी घासून ज्वाला निर्माण करून पेटविला जातो तो अवघ्या ४० सेकंदात पेटला येणाऱ्या भविकांसाठी दररोज दोन्ही वेळ सुमारे१५ ते२० हजार भक्त भोजनाच्या प्रसादाचा लाभ घेत आहे.

यासाठी शहरासह जिल्हाभरातून ४ ट्राली गहू तांदूळ अन्न धान्य गोळा झाले १० दिवसां करिताचा भाजीपाला धूळे बाजार समितीकडून दररोज पहाटे मिळत आहे पालीका प्रशासनाने  स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चोख केली आहे तर विज मंडळाचे देखील अखंडीत सेवा सूरू आहे पोलीस प्रशासनाने बंदोबस्त देवू केला मात्र हा धार्मिक सोहळा म्हणून आम्ही घेतला नाही खाजगी सिक्यूरिटीतील तरूण हे काम करित आहेत सुमारे५०० अपंगांना विविध साहित्य वाटप केले ते आता दरवर्षी वाटप करण्याचा मानस प्रसाद महाराजांनी व्यक्त केला रक्तदानाचे माद्यमातून १००८ रक्त बाटल्या संकलन करण्याचा संकल्प पूर्णत्वास येत आहे रूग्णसेवा  व अपंगसेवा हि भगवंताची सेवा आहे त्यात भावनिक अंतरिक आनंद आहे सत्कर्मातून पूण्य कमाविण्यासाठी श्रीमंत गरिब असा भेदभाव भगवंताकडे नाही त्यामूळे या सोहळ्यात कोणीही प्रमूख नाही सर्वच शिस्तिने स्वयंम सेवकाची जबाबदारी ऊत्सफूर्तपणे पार पाडत आहेत.

प्रत्येकाने तन मन धन  देवून आपल्या परिने काम केल्याने सोहळा यशस्वीपणे पार पडत आहे दररोज आपण स्वतः परिसर स्वच्छ करवून घेत आहोत दूपारी २ वाजे पर्यंत चाललेल्या तूकाराम गाथे नंतर मद्यान्हाच्या वेळी महाराजांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी सेवा निवृत्त पोलीस अधिकारी राजेंद्र भामरे महेश कोठावदे राजू शुक्ल येवले आप्पा पवन पाटील आदि सेवेकरी ऊपस्थित होते बोरी पात्रात भरलेल्या या धार्मीक सोहळ्यात परमार्थााचा आनंद लूटण्यासाठी खान्देश विदर्भ मराठवाड्यासह बारामती दौंड मूंबई ठाणेआदि भागातून भाविक आले आहेत ऊर्वरित या दोन दिवसांच्या सोहळ्यालाही भविकांनी ऊपस्थिती देवून परमार्थाचा आनंद लूटावा व या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थानचे वतीने प्रसाद महाराजांनी केले आहे     

विज  बचतीचा संदेश देणारा दिपोत्सव….

ऊद्या दि २७ रोजी सांयकाळी ७ वाजता बोरी पात्रात दिपोत्सव सोहळा होणार आहे या भव्य दिव्य कार्यक्रमात १५ मिनटे सर्व विज पूरवठा बंद करून  प्रत्येकाचे हातात मेणबत्ती किंवा पणती लावून मंद प्रकाशात सामूहिक ज्ञानेश्वरीच्या १५ ओळी म्हटल्या जाणार आहे या सोहळ्यात प्रत्येक्ष सहभाग ज्यांना घेता येत नसेल त्यांनी घरातील विज पूरवठा १० मिनटे बंद करून देवाजवळ शुभंकरोती किंव्हा ज्ञानेश्वरीच्या १५ ओळी सामूहिक कूटूंबाने म्हणून धार्मिक परमार्थाचा आनंद घ्यावा यातून १० मिनटासाठी बंद केलेल्या विजपूरवठ्यातून विज बचतही होणार असून या सोहळ्यात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराजांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *