“सोशन मिडिया आणि आधुनिक प्रेम”

सोशल मीडियावर बळी पडणारी “ती”….

बारावीच्या परीक्षेचा रिझल्ट लागताच बाबांनी मोबाईल घेऊन द्यायचे प्रॉमिस पाळले, आणि हातात चॅटिंगचे हक्काचे साधन आले . या आधी मैत्रिणीच्या मोबाईलवर डिपेंड राहावं लागायचे . कधी कधी तर आईचा अथवा बाबांचा मोबाईल काहीतरी सर्च करायच्या बहाण्याने घ्यावा लागायचा . आणि चोरून फेसबुक ला लॉग इन करून चाट करावी लागायची. आता तर फेसबुक सोबत मला माझे स्वतःचे व्हाट्सअप अकाउंट वापरता येणार होते.
तसे फेसबुक ला अकाऊंट ओपेन करून दोन वर्षे झाली होती. पण मोबाइल नसल्यामुळे जास्त वापरता येत नव्हते. फेसबुक ला क्लास मधील सर्वच मित्र मैत्रिणी ऍड होत्याच. त्यातील एकाने मला प्रपोजसुद्धा केले होते. मी जेव्हाही फेसबुक ला ऑनलाईन दिसायची त्याचा मेसेज इनबॉक्स ला येऊन पडायचाच. मी सुद्धा त्याला थ्रिल म्हणून रिप्लाय घ्यायची. तसा तो दिसायला अट्रॕकक्टिव्ह होता. आमचे एकमेकांशी फ्लर्ट तर बिनधास्त चालायचे. पण जेव्हाही चाटींग रंगात यायची तेव्हाच बाबांचा, आईचा, मैत्रिणीचा मोबाईल नाईलाजास्तव परत द्यावा लागायचा. पण आता तसे काहीच होणार नव्हते. मी मोबाईल घेताच आधी फेसबुकला लॉग इन करून सर्व जवळच्या मित्र मैत्रिणींना मोबाईल नंबर दिला . साहजिकच त्यालाही व्हाट्सअप नं. इनबॉक्स केला. त्याचाही लगेचच मेसेज आला , पण तो मेसेज आता फेसबुकला नाही तर व्हाट्सअपला होता.
“व्हाट ए डिपी..! , लुकींग सो ब्युटीफुल…”
मी सुध्दा ,
“थँक यू. यु अलसो लुक हँडसम..” असा रिप्लाय केला. त्यानंही स्माईली पाठवली.

बारावीचा रिझल्ट नुकताच लागून गेला होता. दोघांनाही चांगल्याप्रकारे मार्क्स होते शिवाय इंजिनियरींगला लागणारा क्रायटेरीया आम्ही पूर्ण केलेला होता. सीईटी तसेच एआयईईई मध्येही चांगला स्कोर होता. त्यामुळे निश्चितच आपण इंजिनियरींग करायचे हे ठरवलेलेच होते. त्याला मेसेज टाकला,
“फॉर्म वर कॉलेजेस टाकायच्या आधी मेसेज करशील. मी सुध्दा तेच टाकणार.”
त्यानं तसे व्हाट्सअप केले. मी तेच कॉलेजेस टाकले. मार्क्स जवळपास सारखेच असल्यामुळे दुसऱ्याच राऊंडला आम्हा दोघांनाही सारखेच कॉलेज मिळाले. पण ब्रांच वेगवेगळ्या होत्या. त्याला मेकॕनिक्समध्ये इंटरेस्ट होता तर मला कंप्युटरमध्ये.

बॕगा पॕक झाल्या आणि आम्ही ओपन अप. त्याच्या प्रपोजचे ॲन्सर न देताच त्याला माझा होकार कळलेला होता. माझी सकाळ आणि रात्र त्याच्याच मेसेजनी व्हायची. कॉलेजला तर सोबतच राहायचो शिवाय कॉलेज संपल्यावरही पुष्कळसा वेळ सोबत जायचा. फेसबुक – व्हाट्सअपमुळे जग जवळ आले की नाही माहिती नाही पण आम्ही मात्र नक्कीच जवळ आलो होतो.

चॕटिंग रोजच व्हायची पण त्याचे स्वरूप बदलत होते. ज्या गोष्टी समोर बोलता येत नव्हत्या त्या गोष्टी तो व्हाट्सअपला बोलायचा. आता चॕटिंग “लव यु” वरून “फक यु” पर्यंत पोहचली होती. “लव यु, किस यु, हग यु, फक यु” यासारखे शब्द सहजच चॕटिंगवर बोलताना यायचे. मी ही त्याला हवातसा रिप्लाय द्यायची. फेसबुकपेक्षा व्हाट्सअपला चॕट करायला मजा यायची. मी त्याला माझ्या सर्वच गोष्टी शेअर करायची. त्याला माझा महिन्यावारी येणाऱ्या मासिक पाळीच्या डेट सुध्दा माहिती राहायच्या. व्हाट्सअप ला मी सुध्दा त्याला “ब्लड चा थेंब असलेला इमोजी” नेमका सेंड करायची. कित्तेकदा सेनेटरी नेपकिन्स त्यालाच येताना कॉलेजला घेऊन ये असा हक्काने मेसेज करायची. तोही प्रेझंटदेतो तसा पेपरमध्ये गुंडाळून द्यायचा. सांगायचे झालेच तर माझ्या इनर वियरस् ब्रा – पँटिज सुध्दा तो आणुन द्यायचा. त्याही गीफ्ट म्हणूनच मिळायच्या. त्याला फक्त त्याबदल्यात माझ्या बिकनी पोजेस हव्या असायच्या. रात्रीला ह्या बिकनी इमेजेस मुद्दाम मीही त्याला सेंड करायची. व चॕटिंग हळूहळू सेक्स चॕटचे रूप घ्यायची. शेवटी जेव्हा तिच्या आणि माझ्या कमरेखाली ओल सुटायची तेव्हा मात्र कमालीची पोकळी भासायची , एकमेकांची अतोनात गरज भासायची. एकमेकांच्या जवळ नसल्याची खंत वाटायची.

यातच दोघांनी ठरविले-
“एक रात्र सोबत काढायची.”

तसे एकमेकांना मेसेजेसची देवाणघेवाण झाली.
दिवस ठरला. आता पर्यंत जो सेक्स चॕटवर केला तो सेक्स प्रत्यक्षात करण्यात त्यापेक्षाही खूप मजा असते हे अनुभवलं.
अशा कित्तेक रात्री आम्ही सेक्स चॕट केल्या . कित्तेक रात्री एकाच रूमवर , एकाच बेडवर घालवल्या. कंडोम, प्रेग्नंसी अव्हाईडिंग टॕबलेटट्स, सेक्स पावर इम्प्रूव्हिंग टॕबलेट्स सगळं सगळं टेस्ट केलं.

इंजिनियरींगचे लास्ट इयरचे पेपर संपले. मी गावी आले. तोही त्याच्या गावी गेला. काहीदिवस महिने भेटणे झाले नाही. आता चॕटिंग चालायची परंतु रोज नव्हती होत. कारण घरचे आता लग्नासाठी स्थळ बघायला लागले होते. मला कुठेतरी या नात्याला फुलस्टॉप लावायचे असे गरजेचे वाटू लागले होते. मी आता मेसेजेस करणे हाळूहळू कमी करण्याचा प्रयत्न केला. तो मात्र मी अॉनलाईन असो वा नसो माझा पिच्छा पुरवायचा. कधी व्हाट्सअप तर कधी फेसबुक. मी जेवढी त्याला टाळत होते तो तितकाच माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. मला काही केल्या आता कुटूंबाच्या मनानुसारच लग्न करावे लागणार हे त्याला कित्तेकदा सांगून झाले होते. पण तो लग्न होईपर्यंत तरी रिलेशनशीपमध्ये राहू असा हट्ट धरून होता.
फेसबुक , व्हाट्सअप हा आमच्या दोघांमधला दुवा होता. हे मी ओळखून होते. आणि तो ब्रेक केल्याशिवाय आता पर्यायही नव्हता. मी फेसबुक अकाउंड डिॲक्टिव्ह केले. मोबाईल नं. चेंज केला. नविन नं. घेतला. नविन व्हाट्सअप चालु केले.
आता तो इंटरनेटच्या कुठल्यातरी चॕट साईटला अडकून राहिला होता. मी त्याची मनोमन माफी मागितली आणि नविन व्हाट्सअपसह माझ्या आयुष्याच्या सेकंड इनिंगची सुरवात केली.
लेखक – सुधीर त्र्येंबकराव पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *