अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर शहरात २०० मीटर च्या आत पक्षाचे बूथ लावल्याने आचारसंहिता भंगाचे एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्यात आरोपी मोहित विजय सोनवणे व मुकेश रमेश पारधी यांनी पंचायत समितीच्या आवारात १६६ क्रमांकाचा बूथ लाऊन मतदारांना चिठ्ठी वाटप करताना आढळून आले. त्यामुळे आचारसंहिता भंग केला याबाबत आचारसंहिता प्रमुख अजय नष्टे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच इंदिरा गांधी शाळेजवळ बूथ क्रमांक १८३ जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे नाव व फोटो असलेल्या चिठ्ठ्या बुथवर आढळून आल्याने चेतन नामदेव मिस्तरी, निलेश धनराज भोई व सागर महेंद्र बडगुजर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंचायत समितीजवळील बुथवर उमेश सतीश सोनार व पठाण काशीफखान इस्माईल यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव व चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या मतदारांना वाटप केल्यामुळे त्यांच्यावरही आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.