अमळनेर(प्रतिनिधी) सध्या लोकसभेची रणधुमाळी चालू असताना आज प्रत्येक मतदाराला एकच प्रश्न पडला असेल मतदान करु कुणाला अन का.? तर ह्याप्रश्नाच उत्तर मोदीं नेतृत्वानं दिलं जरी असलं तरी मोदी म्हणजे देशाचा एक हात बळकट जरी झाला तरी मोदी आपल्या मतदार संघात येऊन काम करणार नाहीत तर खंबीर नेतृत्व काम करणारं नेतृत्व मतदार संघात असायला हवय ते नेतृत्व उन्मेष पाटील च्या रुपानं मिळणार असे भाजप च्या कार्यकर्त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे..
देशाची निवडणूक जरी असली तरी पंतप्रधान मोदींच्या बरोबरीनं चांगला अन जनतेचे प्रश्न सोडवू शकणारं नेतृत्व दिल तर देशाची प्रगती तर होते पण मतदार संघाचीही प्रगती होते.उन्मेषदादा पाटील लोकप्रिय नेवृत्व भाजपाने दिलय .उन्मेषदादांसारख नेतृत्व जळगाव मतदार संघात आहे.जळगावातही बरीच नेते आहेत पण भाजपने उन्मेषलाच उमेदवारी दिली कारण उन्मेष पाटील च काम केंद्रानंही बघीतलय.चाळीसगावात त्यांनी शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार हा महत्वाचा प्रकल्प त्यांनी गावागावात नेला .शेतकर्यांची प्रश्न सोडवली.जळगावातील सर्वच नेत्यांशी मैत्रीचे संबंध असलेला नेता आहे.
जळगावचा विकास होणारच यात शंका नाही शेतकऱ्यांची जाणीव शेतकऱ्यालाच असते अन हे शेतकऱ्याच दुखण जाणणारा नेता तरुण तडफदार नेतृत्व जळगावकरांना लाभलय असे मत भाजपच्या कार्यकर्त्यांनी खबरीलालशी बोलतांना सांगितले.