अमळनेर विधानसभा मतदार संघात लोकसभेसाठी ३२३ मतदान केंद्र सज्ज…

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर विधानसभा मतदार संघात लोक सभेसाठी 323 मतदान केंद्र सज्ज झाले असून प्रत्येक केंद्रावर मेडिकल किट देऊन अवघ्या 20 मिनिटात सुविधा मिळेल या पद्धतीने डॉक्टरही सज्ज ठेवण्यात आले आहेत विशेष म्हणजे प्रत्येक केंद्रावर बचत गटांमार्फत कर्मचाऱ्यांना चहा , नाश्ता , जेवणाची सुविधा करण्यात आल्याची माहिती सहाययक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली.
323 मतदान केंद्रांसाठी 1615 कर्मचारी नेमण्यात आले आहेत तर 323 पोलीस कर्मचारी बंदोबस्त साठी ठेवण्यात आले आहेत 32 सेक्टर अधिकारी व त्यांना सहाययक म्हणून 32 अधिकारी स्वतंत्र नेमण्यात आले आहेत 3 सेक्टर अधिकारी राखीव आहेत 7 सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले आहेत पारोळा तालुक्यातील धाबे येथील केंद्र क्रिटिकल असल्याने तेथे एक सूक्ष्म निरीक्षक कॅमेऱ्यासह तैनात ठेवले आहे 10 टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.
प्रत्येक केंद्रावर पाळणा घर असून अंगणवाडी सेविका , आशा वर्कर मदतीला आहेत मतदानाला येणाऱ्या महिलेचे बाळ मतदान होईपर्यंत पाळणाघरात सांभाळला जाणार आहे पंचायत समितीमधील मतदान केंद्र सखी केंद्र म्हणून सजवण्यात आले असून तेथे प्रत्येक कर्मचारी महिला आहे पोलीस देखील महिला आहेत तर आदर्श केंद्र म्हणून सानेगुरुजी शाळेतील केंद्र सजवण्यात आले आहे
विविध केंद्रांवर तसेच साहित्य वाटप केंद्रांवर सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे अनेकांनी सेल्फीचा आंनद लुटला अमळनेर येथे साहित्य वाटप करताना अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वाढते तापमान पाहता कुलर ची सुविधा उपलब्ध केली होती तर जेवणाची ही सुविधा होती निवडणूक कर्मचार्यनसाठी रात्री जेवण , सकाळी चहा , नाश्ता , दुपारचे जेवण करण्याची व्यवस्था बचत गटांमार्फत करण्यात आली आहे पुरेशा पाण्याचीही व्यवस्था झाली आहे मतदान झाल्यानंतर साहित्य जमा कारायला रात्री कर्मचारी परत आल्यानंतरही त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे सर्व डॉक्टरांची बैठक घेऊन अवघ्या 20 मिनिटात सर्व केंद्रांवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करू शकू याची पूर्ण तयारी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *