अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचाराचे बॅनर दगड विटा मारून फाडून विद्रुप केल्याची घटना २१ रोजी पहाटे अडीच वाजता राणी लक्ष्मीबाई चौकात घडली.
याप्रकरणी पोलिसात तीन जणासह अज्ञात ५ ते ६ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२१ रोजी पहाटे रफिक शेख रशीद रा गांधलीपुरा चौधरी गल्ली हे पहाटे अडीच वाजता ‘शबे बडी रात’ असल्याने नमाज पठण करून राणी लक्ष्मीबाई चौकात आले असताना त्यांनी राहुल भोई रा शिवशक्ती चौक , कुणाल ( श्रीराम चौधरी यांच्या दुकानावर काम करणारा ), कन्हैया उर्फ गणेश चौधरी रा गांधलीपुरा यांच्यासह इतर ५ ते ६ मुलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या बॅनर वर दगड विटा मारून फाडून टाकले व विद्रुप केले रफीक शेख याना पाहून ते पळून गेले शेख यांनी ही घटना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वास पाटील यांना सांगितल्या नंतर तालुकाध्यक्ष सचिन पाटील , शहराध्यक्ष मुख्तार खाटीक , रणजित भीमसिंग पाटील, उपाध्यक्ष अनिल पारधी यांना कळवण्यात आली त्यांनी घटना प्रत्यक्ष बघून आरोपींचा शोध घेतला मात्र आरोपी सापडले नाहीत विश्वास पाटील यांच्या फिर्यादीवरून राहुल भोई , कुणाल व गणेश चौधरी विरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम १९९५ च्या कलम ३ प्रमाणे व भादवी कलम ४२७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल दीपक विसावे करीत आहेत.