झोपेचं सोंग घेणाऱ्या महसूल प्रशासनाला आली जाग ; खबरीलाल वृत्ताची दखल विना परवाना शेकडो ब्रास वाळू साठ्यावर होणार कारवाई…

रात्रभर वाळू साठ्याजवळ तलाठ्यांची गस्त

अमळनेर (खबरीलाल ऑनलाईन) खबरीलाल ने काल अमळनेर महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानं वाळू माफियांच चांगभलं या आशयाची बातमी प्रसिद्ध करताच झोपेचं सोंग घेणाऱ्या अमळनेर महसूल प्रशासनाला आली जाग.
अमळनेर तालुक्यातील फाफोरे हिंगोणे दरम्यान के टी वेयर बंधाऱ्याच्या बांधकामाठिकाणी शासकीय कामांसाठी वाळू लागते या नावाखाली साठे करून वाळू इतरत्र विकून आर्थिक कमाई अधिकच केली जात असल्याची बाब खबरीलाल च्या लक्षात आले आहे.
या शासकीय बंधाऱ्याच्या कामावर अमळनेर तहसीलदार व तलाठी पथकाने काल २ रोजी सायंकाळी तपासणी केली असता प्रथमदर्शनी ५०० ते ७०० ब्रास वाळू अवैध साठा आढळून आला आहे. मात्र अधिकाऱ्यांवर राजकीय दबावामुळे अद्यापही त्या वाळूचा पंचनामा करण्यात आलेला नाही असे समजते. मात्र कारवाई अटळ आहे. खबरीलालच्या वृत्तानंतर धाडसी कारवाईमुळे माफियांच्या वर्तुळात चांगलीच खळबळ माजल्याची चिन्हे दिसुन येत आहेत.
फाफोरे नजीक बंधाऱ्याजवळ अवैध वाळू साठ्याची मध्यरात्री खबरीलाल ने प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथे अमळनेर शहर तलाठी गणेश महाजन,फाफोरे, सडावन, तलाठी जितेंद्र जोगी, कोतवाल भटू भदाणे, मंगरूळ, दत्तू बोरसे,शिरूड, सुरेश सोनवणे, सडावण, धोमन बिऱ्हाडे,फाफोरे हे रात्रभर वाळू साठ्याजवळ तलाठ्यांची गस्त होती. तहसिलदार काय कारवाई करतात याकडे अमळनेरकरांचे लक्ष लागून आहे.
तसेच अमळनेर-धुळे स्त्याच्या दुपदरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. अस्तित्वात असलेल्या त्या डांबरी रस्त्याच्या दुतर्फा जमिनीचे खोदकाम करुन तेथे मुरुमाचे भरण टाकण्यात येत आहे तसेच रस्त्यांच्या ठिकठिकाणी लहान (मोऱ्या) पुल बांधकामासाठी लागणारी वाळू ही विनापरवाना असून तेथे ही अवैध वाळू साठा मोठ्या प्रमाणात आहे.


शहरातील बांधकाम ठिकाणी पंचनामे होणार का…?


शहर आणि ग्रामीण भागात उतरविण्यात येत असलेली वाळू यांची जागेवरच तपासणी करून बांधकाम व्यावसायीकांकडे राँयल्टी पावती नसल्यास महसूल विभागाने पंचनामा करून संबंधित बांधकाम व्यवसायीकांवरही दंड करून कारवाई करावी अशी जनतेची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा सतत खबरीलाल ठेवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *