अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर येथील वाडी चौका जवळील कुंभार टेकडी परिसरातील दातांचा सुप्रसिद्ध डॉ.विनय भट यांनी स्वतःच्या मालकीच्या घरामध्ये छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज २ रोजी मंगळवारी दुपारी २ वाजता उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.
डॉ.विनय गोपाळ भट वय (५६ ) असे मृतक इसमाने नाव आहे. अमळनेर येथील कुंभार टेक जवळ २५ वर्षांपासून दातांचा दवाखाना सांभाळत होते. कुंभार टेकवरील स्वमालकीच्या घरामध्ये डॉ. विनय भट यांनी ज्या रूम मध्ये गळफास घेतली त्याच रूम मध्ये काही वर्षांपूर्वी याच कुटुंबातील वडील,भाऊ यांनी फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे समजते, अशी परिसरात चर्चा सुरु होती.घरासमोर मोठी गर्दी झाली होती.
आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसून, पोलिस तपास सुरु आहे. त्यांच्या पश्चात मुलगा अभिषेक उर्फ(कृष्णा) व मुलगी,पत्नी असा परिवार आहे.