सावधान वाहनांवर पक्ष चिन्ह असल्यास वाहने जप्त करणार

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदार संघात आपल्या वाहनांवर पक्ष चिन्ह स्टिकर असल्यास वाहने जप्त करण्यात येतील. तसेच दररोज 1 लाख मर्यादेचे उल्लंघन नको अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक वेणुगोपाल गोडेशी यांनी येथील सहाय्यक निवडणूक कार्यालयात झालेल्या बैठकीत केल्या यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी सीमा अहिरे तहसीलदार ज्योती देवरे उपस्थित होते.
निवडणूक खर्च निरीक्षक वेणूगोपाल गोडेशी यांनी दुपारी अमळनेर येथे भेट दिली त्यावेळी त्यांनी भरारी पथक, स्थिर सर्व्हेक्षण पथक, छायाचित्रण पाहणी पथक, छायाचित्रण पाहणी पथक आचारसंहिता कक्ष, निवडणूक खर्च शाखा या सर्व शाखांची एकत्रित बैठक घेऊन सूचना केल्या. त्यात व्हिडीओ चित्रीकरण कसे करावे याबाबत सूचना करतांना उमेदवाराच्या सभा भाषणाबरोबर वाहने झेंडे नाश्ता कोणता दिला इत्यादी बारीक गोष्टींचे चित्रीकरण करावे तसेच व्हिडिओ पाहणी समितीने या बारीक गोष्टींची तपशीलवार माहिती निवडणूक खर्च शाखेकडे सुपूर्द करावी कोणत्याही उमेदवारांनी त्यांना करावयाच्या खर्चाचे उल्लंघन होणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे, सर्व पथकांनी क्रियाशीलपणे कामकाज करावे, लेखा परीक्षण पथकाने छायाचित्रण नोंदवहीत जिल्हा स्तरावरून घोषित केलेल्या वस्तू व सेवा दरांप्रमाणे उमेदवाराने खर्चाची अचूकपणे नोंद केली आहे काय याची अचूक खातरजमा करावी, त्यासाठी वर उल्लेखित पथकांच्या अहवालाप्रमाणे पडताळणी करावी, उदा उमेदवाराने सभेत भरारी पथक व छायाचित्रण पथक यांच्या व्हिडीओ सीडीत व्हिडीओ पाहणी पथकाने पाहून त्यात भाषणाबरोबर वाटण्यात आलेल्या पाणी बाटल्या, नाश्ता गाड्या संख्या झेंडे बॅनर्स, आदी बाबी मांडून लेखा पथकाकडे अहवाल द्यावा. सर्व पथकांनी मिळून असे समनव्यातुन कामकाज करून सर्व बाबी खर्चात नमूद नसल्यास पुराव्याची संचिका बनवून लेखा पथकाने शॅडो रजिस्टरला नोंद घ्याव्यात स्टील निगराणी पथकांनी सर्व वाहनांची तपासणी करावी व लेखी अहवाल सादर करावा, भरारी पथकाने सर्व गावांना भेटी द्याव्यात व या वाहनांवर पक्षाची स्टिकर चिन्ह दिसून येईल अशी वाहने जप्त करावीत व कारवाई करावी अशा सूचना केल्या.



अमळनेरात तीन ठिकाणी चेक पोस्ट –

अमळनेर तालुक्यात आडमार्गावरील तीन ठिकाणी हे तपासणी नाके उभे करण्यात आले आहे. यात अमळनेर मतदार संघ क्षेत्रात पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण,धुळे रस्त्यावरील चोपडाई, व अमळनेर शिरपुर रस्तयावरील भरवस या तीन ठिकाणी एक नायब तहसिलदार दर्जाचा अधिकारी, तीन पोलीस कर्मचारी,व्हिडीओग्राफर हे भरारी पथक तर स्थिर संघसहनियंत्रण पथक असे पथक नियुक्त करण्यात आले आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *