जळगांव लोकसभा मतदारसंघात निवडणुका आता काही दिवसांवर आल्या आहेत. प्रत्येक नागरिकाचं मत हे फार अमूल्य असतं. मतदानाला जातेवेळी तुमच्याजवळ तुमचे ओळखपत्र हे असणे अत्यंत गरजेचे आहे. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या ओळखपत्रांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
▪ पासपोर्ट
▪ वाहन चालक परवाना ( ड्रायव्हिंग लायसन्स )
▪ छायाचित्रे असलेले कर्मचारी ओळखपत्र ( केंद्र्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/ सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचा-यांना दिलेले ओळखपत्र )
▪ छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक
▪ पॅनकार्ड
▪ एनपीआर अंतर्गत आरजीआय द्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड
▪ मनरेगा कार्यपत्रिका
▪ कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
▪ छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
▪ खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
▪ आधारकार्ड
निवडणूक आयाेगाने विविध ११ ओळखपत्रांच्या आधारे मतदान करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु त्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे.