अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील निम येथे शेतात बांधावरून जाणाऱ्या मजुरांना हटकल्याचा राग आल्याने चौघांनी एकाला बेदम मारहाण करून दात पाडला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १८ रोजी घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गोकुळ नारायण पाटील (वय ५६, रा. निम) दि.१८ रोजी सकाळी १०.३० वाजता निम शिवारात असताना शेतात चंपालाल हिरामण पाटील, मयूर चंपालाल पाटील, संभाजी मंगल पाटील, गोपाल विठ्ठल पाटील हे आले. त्यांनी तू आमच्या मजुरांना तुझ्या बांधावरून का जाऊ देत नाही ? अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी हा तुमचा शेतात जाण्यासाठीचा रस्ता नाही, असे सांगितल्याचा राग आल्याने चौघांनी त्यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करत तोंडावर बुक्काने मारून दात पाडला. तसेच जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी मारवड पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ प्रवीण पारधी हे करीत आहेत.