अमळनेर (प्रतिनिधी) येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल चा ८७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रताप महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा.डॉ.जयेश गुजराथी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी हे प्रमुख अतिथी होते.
व्यासपीठावर कार्योपाध्यक्ष सी.ए. नीरज अग्रवाल, शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, संचालक प्रदीप अग्रवाल योगेश मुंदडा, संस्थेचे देणगीदार अभिजीत भांडारकर, विवेकानंद भांडारकर, निलेश भांडारकर, अनिल वैद्य, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन, संस्थेचे सेक्रेटरी प्रा.पराग पाटील, अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडा, संचालक प्रवीण जैन, अॅड. विवेक लाठी, रोटरी अध्यक्ष देवेंद्र कोठारी, सचिव आशिष चौधरी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी. एल. मेखा, मंगळ ग्रह संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सेवा निवृत पर्यवेक्षक व्हि.व्ही.कुलकर्णी, डी. आर. कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी, र. सा. पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्ना शिसोदे, मुख्याध्यापक व्ही. एम. पाटील, उपमुख्याध्यापक ए.डी.भदाणे, पर्यवेक्षक एस.आर. शिंगाणे, सी. एस. सोनजे, शिक्षक प्रतिनिधी आर. जे. पाटील, शिक्षकेतर प्रतिनिधी पी. ए. जैन, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.जयेश गुजराथी यांनी मेहनत, कष्ट व चिकाटी या त्रिसूत्रीद्वारे विद्यार्थ्याचा यशाचा आलेख उंचावत असल्याचे सांगितले. शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी यांनी शाळेच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी केक कापण्यात आला. तसेच शाळेचा वर्धापन दिनाचा लोगो फुग्यांचा सहाय्याने मान्यवरांच्या उपस्थितीत आकाशात सोडण्यात आला. अहवाल वाचन मुख्याध्यापक व्हि.एम.पाटील यांनी केले. अध्यक्षांचा परिचय उपमुख्याध्यापक ए.डी.भदाणे यांनी तर प्रास्ताविक पर्यवेक्षक एस.आर. शिंगाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन राहुल जगतराव पाटील यांनी केले. आभार पर्यवेक्षक सी.एस.सोनजे यांनी मानले
विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
यावेळी एसएससी परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा तसेच क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लबतर्फे ज्ञान आकांक्षा प्रस्तुत आयडियल स्टडी या अॅपचे १० वी च्या विद्यार्थांना मोफत वाटप करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. अर्बन बँकेचे संचालक भरतकुमार सुरेश ललवानी, सेवानिवृत शिक्षक डी. ए. बहिरम, उद्योजक भावेश जैन, माजी मुख्याध्यापक पी. एल. मेखा, माजी पर्यवेक्षक व्ही. व्ही. कुलकर्णी, उपशिक्षक एन. जे. पाटील, धुळे नंदुरबार सोसायटीचे कर्मचारी गिरीश शांताराम पाटील, पालक शिक्षक संघाचे ज्ञानेश्वर पाटील (जानवे) यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश दिले.
प्रताप हायस्कूलमध्ये कार्यक्रम
खा.शि.मंडळातील प्रताप हायस्कूलचा ११७ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे सचिव प्रा. पराग पाटील प्रमुख पाहुणे उपस्थित होते. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना स्वेच्छेने मोफत गणवेश व शालेय दप्तर वाटप केले. तसेच शालेय विविध परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना या वेळी बक्षिस देण्यात आले. वाढ दिवसाचे प्रतिक म्हणून केप कापण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक निकम, प्राथमिकचे मुख्यध्यापक कैलास पाटील, चंद्रकांत कंखरे, किरण सनेर, कल्पेश सूर्यवंशी, कृष्णा कोळी, विनोस पाटील सर्व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.