अमळनेर (प्रतिनिधी) येथील भद्राप्रतिक मॉलमध्ये भारतात सुप्रसिद्ध असलेल्या एस. एस.मोबाईलचे आज दि. १९ जुलै रोजी ग्रँड ओपनिंगचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे हे नवे दालन मोबाईल धारकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. यातून साळी बंधूंच्या भद्राप्रतिक ग्रुपने अजून एक गरुड झेप घेतली आहे.
एस. एस. मोबाईलचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा येथे सुमारे ३५५ शाखा या ग्रुपच्या असून खरेदीवर विशेष व आकर्षक ऑफर याठिकाणी मिळत असतात. अमळनेर येथे भद्राप्रतिक मॉलमध्ये याचा शुभारंभ शनिवार दि. १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी अध्यक्षस्थानी खासदार स्मिता वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, कृषिभूषण साहेबराव पाटील, शिरीष चौधरी, मार्केट सभापती अशोक पाटील, प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे, डीवायएसपी विनायक कोते, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन प्रताप साळी, दीपक साळी, प्रसन्नजीत साळी व अक्षय उर्फ मॉन्टी साळी यांनी केले आहे.
एस एस मोबाईल म्हणजेच ब्रँड
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व मध्य प्रदेशात ४०० मोबाइल स्टोअर्स या सुप्रसिद्ध एसएस मोबाइलचे असून या स्टोअर मध्ये बिग सेलअंतर्गत एक मोबाइल खरेदीवर ४ ऑफर्स, प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर २ वर्षांची वॉरंटी, प्रत्येक खरेदीवर ४९९९ पर्यंतचे हमखास गिफ्ट, ४००० पर्यंतचा कॅशबॅक व स्मार्टफोन खरेदीवर ३० टक्क्यांपर्यतचा भरघोस डिस्काउंट असे विविध फायदे ग्राहकांना दिले जात असतात. तसेच ब्रँडेड स्मार्ट वॉच एअरबड, नेकबॅण्ड, पॉवर बँक, एअरफोन्सवर ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळते. जेबीएल, बोट, वनप्लस, नॉईस, गिझमोर या नामांकित ब्रँडचे स्मार्ट अॅक्सेसरीज याठिकाणी उपलब्ध असतील. सर्व नामांकित फायनान्स, बँकांचे ईएमआय व कॅशबॅक ऑफर्स तसेच एक्स्चेंज ऑफर्स याठिकाणी उपलब्ध असणार आहेत.
असा उंचावला साळी बंधूंचा प्रगतीचा आलेख
धार्मिक व सामाजिक व व्यावसायिक अग्रेसर असलेल्या साळी परिवारात साधारणता १९५० च्या दशकात त्यांच्या आजी-आजोबांनी पैलाड भागात ओट्यावर लहानसे किराणा दुकान सुरू केले होते. त्यानंतर वडील स्वर्गीय आप्पासाहेब छबुलाल शेठ यांनी मॅट्रिक नंतर १९५७- ५८ च्या दशकात १२५ रुपये भांडवल आई-वडिलांकडून घेऊन लहानसे किराणा टपरी दुकान सुरू केले. किराणाच्या माध्यमातून या भागातील गोरगरीब परिवाराला योग्य मदत व सहकार्य ते सदैव करीत राहत होते, त्यांच्या सुख दुःखात अडीअडचणीत त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहत होते, त्यातच जनतेचा विश्वास संपादन करून जनतेने १९६५ ते १९८० दरम्यान आप्पासाहेबांना नगरसेवक पदी विराजमान केले होते. नंतर १९८५ ला आप्पांच्या निधनानंतर प्रताप, दीपक, संदीप व चार बहिणी यांच्यावर जबाबदारी येऊन ठेपली त्यांनी पण आजी बाबा व आप्पांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या वारसा पुढे नेला. रेशन दुकान, किराणा दुकान, रॉकेल, पोल्ट्री फार्म,गोट फार्म असे विविध उद्योग करून व मेहनत इमानदारी जोपासली. २००४ साली त्यांच्या आते भगिनी मनीषाताई बडकस व रामशेठ बडकस यांच्या कुश न फर्निचरच्या शोरूम मधून भांडवल फक्त पन्नास हजार रुपये असताना त्यांच्याकडून उधारीने माल मागवून फक्त पन्नास हजार रुपयात व्यवसाय उभा केला. आणि बघता बघता फर्निचर नंतर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात पदार्पण करून आज भ्रद्राप्रतिक ग्रुप म्हणजे उद्योग व व्यापार क्षेत्रातील एक मोठे नाव झाले आहे. आईवडिलांच्या पुण्याइने प्रताप साळी व संगीता साळी यांनी नगरसेवक पदही भूषविले. दीपक साळी हे दोन पंचवार्षिक पासून अर्बन बँकेचे संचालक म्हणून निवडून येत आहेत. त्यांना ग्राहकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, इंटिरियर असे विविध व्यवसायात नावलौकिक मिळविले आहे. आता भारतातील मोबाईल क्षेत्रातील अग्रेसर एस.एस. मोबाईलच्या शोरूमचे मान्यवरांच्या हातून उद्घाटन करून गरुड झेप ते घेत आहेत. याशिवाय शेतकऱ्यांसाठी मंगरूळ गावाजवळ भव्य असे दोन एकरात वेअर हाऊस सुरू करीत आहेत. या सर्व प्रगतीचे श्रेय आमचे हितसंबंधी मित्रपरिवार ग्राहक असून तसेच विशेष म्हणजे हा परिवार संघटित एकत्रित एका क्षेत्राखाली भावांचे व मुलांचे एकमत एक विचार एक जूट असल्याने हे एकत्रित परिवारामुळे एवढी एकजुटीने प्रगती ते करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.