अमळनेर (प्रतिनिधी) उदयनगर येथील महिलेचे बसमध्ये चढताना मंगळसूत्र चोरल्याची घटना १७ रोजी घडली आहे. त्या शाळेत मुलाला घ्यायला आलेल्या असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील उदयनगर येथील प्रतिभा राजेश वाघ (वय ३९) ह्या आपल्या मुलाला अमळनेर येथे शिक्षणासाठी रोज सोडायला व घ्यायला जात असतात. १७ रोजी सायंकाळी ५:१५ वाजता त्या आपल्या मुलाला सोबत घेऊन उदयनगर बसमध्ये चढत असताना बरीच गर्दी होती. बसमध्ये चढल्यानंतर मंगळसूत्राची पोत तुटल्याचे प्रतिभाबाईच्या लक्षात आल्याने पाहिले असता सोन्याच्या दोन वाट्या व सोन्याचे मनी दिसून आले नाही. त्यामुळे त्यांनी व इतर प्रवाशांनी शोध घेतला मात्र मनी आणि वाट्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची खात्री झाल्याने प्रतिभा वाघ यांनी १८ हजार किमतीच्या ३ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या वाट्या व सहा हजार किमतीचे एक ग्रॅम वजनाचे मणी चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ संतोष पवार हे करीत आहेत.