अमळनेर (प्रतिनिधी) येथील हर्ष जितेंद्र भंडारी याने लंडन येथील एआरयु केंब्रिज विद्यापीठातून एमबीए (मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन) पदवी उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली. त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
हर्ष याने बँकिंग नवोपक्रम आणि उद्योजकता या दोन विषयात सुवर्णपदक ही प्राप्त केले आहे. त्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सेंट मेरी हायस्कूल मंगरूळ आणि प्रताप कॉलेज अमळनेर येथे झाले आहे. पुढे बीकॉमची पदवी त्यांनी पुणे येथून संपादन केली. त्याचे पुणे येथील नातेवाईक महेंद्र कुमार सुराणा यांचा सुपुत्र मोहित सुराणा यांनी त्याची हुशारी आणि मेहनत पाहून त्याला उच्च शिक्षणासाठी लंडन येथे येण्यासाठी पूर्ण सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे लंडनला जाणे हर्षला सोयीचे झाले. यासोबतच त्याची आई कल्पनाताई भंडारी यांचा ही सिंहाचा वाटा आहे. पतीच्या निधनानंतर त्यांनी दोन्ही मुलांची जबाबदारी समर्थपने पेलली. ममतेच्या मोहात न गुंता मुलांना खुले आकाश दिले. ते हर्षनेही ते सार्थकी करून दाखवले. हर्षा प्रताप कॉलेजचे माजी उपप्राचार्य स्वर्गीय सुशील कुमार भंडारी यांचा नातू, स्वर्गीय जितेंद्र कुमार भंडारी यांचा सुपुत्र, प्रशांत भंडारी आणि कमलेश भंडारी यांचा पुतण्या आहे.