अमळनेर (प्रतिनिधी) एस.बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या स्वायत्त विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर अमळनेर येथील हर्षल बोरसे यांची निवड करण्यात आली आहे.
हर्षल बोरसे हे कृषी जैविक उत्पादक कंपनी ग्रीन ग्लोब व रायझिंग भारत बायोकेअरचे संचालक तसेच रॉयल इलेट या बांधकाम कंपनीचे संचालक आहेत. सन २०१३-१४ साली त्यांनी एस. बी. पाटील इन्स्टिट्यूटला प्रोफेसर म्हणून काम केले आहे. ते मूळ अनवर्दे खु. येथील असून सेवा निवृत्त मुख्याध्यापक गुलाबराव बोरसे व मंगलाबाई बोरसे यांचे सुपुत्र आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.