अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अमळगाव येथे श्री गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादाने दि. 16 जुलै रोजी श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोदुगत पारायण विद्याताई पडवळ यांच्या सुस्वर आवाजात होणार आहे. लता रमण हॉल, जळोद रोड येथे सकाळी ७.३० ते दपारी ३.३० या वेळेत हा सोहळा होणार आहे.
या भक्तिभावपूर्ण कार्यक्रमात गजानन महाराजांचे दर्शन, प्रवचन, भजन, नामस्मरण व महाप्रसादाचा समावेश आहे. संपूर्ण वातावरण भक्तिरसाने न्हाऊन निघणार आहे. पडवळ यांच्या मुखोदुगत वाचनातून भक्तांना श्री गजानन विजय ग्रंथातील अमोघ वचने ऐकण्याची अत्यंत दुर्मिळ संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री गजानन भक्तपरिवार व समस्त ग्रामस्थ मंडळी यांनी केले आहे. कार्यक्रमात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अआयोजकांनी केले आहे.