अमळनेर (प्रतिनिधी) पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्यानंतर स्नेहल जगदीश पाटील यांचे गावात प्रथमच आगमन होताच टाकरखेडे गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावातर्फे जिल्हा परिषद मराठी शाळेत त्यांचा सत्कार करण्यात आला.
स्नेहलच्या कुटुंबात देश सेवेचा वारसा आहे. तिचे वडील जगदीश प्रभाकर पाटील हे महाराष्ट्र पोलिस विभागात सहाय्यक फौजदार, आजोबा प्रभाकर नारायण पाटील हे रेल्वे सुरक्षा बलातून हवालदार पदावरून निवृत्त झाले आहेत. तिचे मोठे काका अरविंद प्रभाकर पाटील हे आर्मी मधून ऑर्डनरी कॅप्टन पदावरून निवृत्त झाले आहेत, तसेच तिचे लहान काका श्रीधर जगदीश पाटील हे बीएसएफमध्ये कार्यरत आहेत. सत्कारदरम्यान तिने आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे संबोधन केले. तिच्यावर सत्काराचा वर्षाव केला.