जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा संघ उपविजेता

अमळनेर (प्रतिनिधी) पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या ६४वी जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात अमळनेर येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचा संघ उपविजेता ठरला.

ही स्पर्धा गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे पार पडली. यात १५ वर्षांखालील गटात स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेरच्या मुलांनी शानदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. त्यांनी डॉ. उल्हास पाटील स्कूल सावदा (५-०), सेंट मेरी स्कूल एरंडोल (३-०), शानबाग हायस्कूल सावखेडा (२-०) यांना पराभूत करत सलग चार विजय मिळवले. अंतिम सामन्यात गतविजेता लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूल जामनेरकडून अवघ्या १ गोलच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

संघात सहभागी खेळाडूंनी उत्कृष्ट संघभावना व कौशल्य दाखवत सर्वांचे लक्ष वेधले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष  नीरज अग्रवाल, अध्यक्षा सितिका अग्रवाल, मुख्याध्यापक विनोद अमृतकर तसेच सर्व शिक्षकवृंद व क्रीडा विभागाने खेळाडूंचे कौतुक केले. त्यांना मुख्य प्रशिक्षक जय जाधव, क्रीडा शिक्षक विनय निरंकारी व विभागप्रमुख योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *