अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जळोद गावाजवळ पोलिसांनी छापा टाकून पाचोरा येथील दोघांना १५ किलो गांजा पकडला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, एपीअय रवींद्र पिंगळे, सुनील लो.नागरे, अमोल पाटील, गणेश पाटील, जितेंद्र निकंभे, प्रशांत पाटील, सुनील पाटील यांनी ही कारवाई केल्येथील आरोपी महेश कैलास पाटील, नितीन शरद गोंड यांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू होती.