अमळनेर (प्रतिनिधी) नोटीस बजावून ही नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे परेश उदेवाल याने निवेदन देत साखळी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. नोटीस बजावून ही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे नमूद केले आहे. पुढील दहा दिवसांत कोणतीही कारवाई न झाल्यास सात दिवसाचे साखळी आंदोलनाचा इशारा परेश उदेवाल याने दिला आहे.