श्री शिवाजी गार्डन मॉर्निंग ग्रुपतर्फे आयोजित आरोग्यदायी शिबिरास प्रतिसाद

दुर्गा लॅबोरेटरीज च्या सौजन्याने असंख्य महिला व पुरुषांची केली लिपिड प्रोफाइल व थायरॉईड तपासणी

अमळनेर-शारीरिक आरोग्य,सामाजिक उपक्रम, मनोरंजन आणि सामाजिक सलोखा हे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन श्री शिवाजी गार्डन ग्रुप कार्यरत असून याअंतर्गत आजपर्यंत अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविलेले आहेत.असाच एक आरोग्यदायी उपक्रम संपूर्ण ग्रुपसाठी ग्रुप सदस्य तथा शहरातील दुर्गा लॅबोरेटरीज चे संचालक शरद व्ही शेवाळे व सौ वैशाली शेवाळे यांच्या सौजन्याने राबविन्यात येऊन असंख्य महिला व पुरुषांची लिपिड प्रोफाइल व थायरॉईड तपासणी करण्यात आली.
सदर शिबिर प्रसंगी अ भा मारवाडी महिला मंचने शिबिरार्थींसाठी चहा व बिस्कीट ची व्यवस्था करून नियोजनासाठी अनमोल असे परिश्रम घेतले.यावेळी ग्रुपमधील महिला भगिनीं व पुरुष बांधवांच्या अतिशय महत्वपूर्ण रक्त चाचण्या करून देण्यात आल्या.यात प्रामुख्याने लिपिड प्रोफाइल*(Lipid profile)1)Serum cholestrol (शरीरातील चरबीचे प्रमाण) ए)HDL Cholestrol (HDLC) बी)LDL Cholestrol (LDLC) सी)VLDL Cholestrol (VLDLC) 2)Serum Triglycerides (Tg) (बॉडीतील फॅट्स) तसेच Fasting Blood Sugar (उपाशीपोटी शरीरातील साखरेचे प्रमाण तपासणी व प्रमुख चाचणी म्हणजे थोयराईड प्रमाण (TFT) Thyroid function test
(T3,,T4,,,,TSH)याप्रमाणे रक्त तपासण्या करण्यात आल्यात .विशेष म्हणजे तपासणी रिपोर्ट मुंबई येथील नामांकित लॅब चा देण्यात आला.दरम्यान विशेष करून महिलांना थॉयराईड ची समस्या अधिक असते मात्र तपासणी न केल्याने निदान होत नाही परिणामी इतर आजारांना निमंत्रण मिळत असते यामुळे थॉयराईड तपासणी करण्यात आली.तसेच आजस्थितीला हृदय विकाराच्या समस्या देखील वाढल्या असून प्रत्येकाच्या मनात भीतीचे सावंट निर्माण झाले आहे,मात्र यासाठी घाबरण्यापेक्षा दक्षता महत्वाची असून यासाठी लिपिड प्रोफाइल ही रक्तचाचणी करणे ही काळाची गरज आहे यामुळेच ही तपासणी देखील या शिबिरात करण्यात आली .
ग्रुपमधील सर्व महिला भगिनी आणि पुरुष बांधवांनी यास मोठा प्रतिसाद दिला विशेष म्हणजे ग्रुप सदस्यांचे कुटुंबीय व मित्र मंडळी यांनाही या शिबिराचा लाभ देण्यात आला.शनिवार दि 23 मार्च रोजी श्री शिवाजी उद्यान,न्यू प्लॉट अमळनेर येथे हे शिबिर पार पडले.शिबिरात सुमारे 200 लोकांनी लाभ घेतला.शिबिर यशस्वीतेसाठी श्री शिवाजी गार्डन ग्रुप चे सदस्य,दुर्गा लॅबोरेटरीज चा संपूर्ण स्टाफ तसेच मारवाडी महिला मंचच्या अध्यक्षा सौ ज्योत्स्ना जैन,सौ विजया देसरडा,सौ अलका छाजेड,सौ कल्पना शर्मा,सौ संगीता जैन आदींसह सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *