अमळगांव जळोद रस्त्यावर अपघात
अमळनेर (प्रतिनिधी) शेतमजुरांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाला चारचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात २ जण गंभीर तर २० जण जखमी झाले. शनिवारी दि. १२ रोजी सकाळी अमळगाव जळोद रस्त्यावर हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत करून रुग्णालयात हलवले.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील बुधगाव येथून रिक्षा (क्रमांक एमएच १९ , बीजे ४३६५) मध्ये सुमारे १६ शेतमजूर सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास अमळगावकडे आणले जात होते. त्यावेळी अमळगावकडून जळोद कडे जाणाऱ्या चार चाकी (क्रमांक एमएच १९ सी झेंड २५२२) वरील चालक पवन तुकाराम बाविस्कर याने जोरात धडक दिल्याने रिक्षातील काही प्रवासी रस्त्यावर फेकले गेले काही रिक्षात अडकले. घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, राहुल पाटील, योगेश बागुल घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आणि जखमींना उपचारासाठी रवाना केले.
या अपघातात रिक्षात बसलेले विकास भिला कोळी (वय ३५), सचिन कैलास शिरसाठ (वय २२), उमेश कैलास शिरसाठ (वय १९), रघुनाथ साहेबराव शिरसाठ (वय ५५), वैशाली रवींद्र कोळी (वय २७), नंदा विकास कोळी (वय २८), मुक्ताई लीलाधर भोई (वय १७), संगीता बळीराम कोळी (वय ३५), कल्पना रघुनाथ कोळी (वय ४७) , रिक्षाचालक योगेश भिका (कोळी वय ३१ सर्व रा. बुधगाव) यांना श्री अॅक्सिडन्ट हॉस्पिटल अमळनेर येथे दाखल करण्यात आले. तर प्रतिभा कैलास कोळी व कैलास नवल कोळी याना धुळे येथे रवाना करण्यात आले. तर सुवर्णा विलास कोळी (वय ३५) व प्रांजल विलास कोळी (वय १६) यांना मोरया हॉस्पिटल अमळनेर येथे दाखल करण्यात आले. तर चारचाकीतील चालक पवन तुकाराम बाविस्कर, शीतल पवन बाविस्कर, मीराबाई बाविस्कर तसेच अशोका (१३ महिने )तसेच प्रांतल कोळी (वय ३ वर्षे) या बालकांना धुळे येथील देवरे हॉस्पिटल धुळे येथे दाखल केले. तर रेखाबाई भरत शिरसाठ (वय ४५), सुंदबाई उत्तम कोळी (वय ५३), जनाबाई निंबा साळुंखे (वय ७५)याना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
रवि ज्वेलर्स अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74700/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1125/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट