शहरातील स्वामी समर्थ केंद्र, मानव केंद्रासह शाळा, महाविद्यालयात गुरू पौर्णिमा साजरी

अमळनेर (प्रतिनिधी)  शहरातील स्वामी समर्थ केंद्र, मानव केंद्रासह शाळा, महाविद्यालयात गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. या वेळी मानवी जीवनात गुरूचे महत्व काय आहे, हे सांगण्यात आले. प्रत्यकाने आल्या गुरूला वंदन केले.

फार्मसी महाविद्यालय खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व.पंढरिनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी व स्व.र.का.केले.काॅलेज ऑफ बी.फार्मसी येथे विद्यार्थ्यांतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षक व शिक्षकेतर गुरूंसाठी कृत्रज्ञतापर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी सतिष लांडगे व रिमझिम दिपक तोलानी यांनी केले.

रेणुका जोशी व वेदांती चौधरी यांनी गीत गायन केले. तसेच साक्षी प्रविण सोनवणे, अश्विनी चौधरी, वैष्णवी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या निमित्ताने प्राचार्य प्रा.डाॅ.रविंद्र सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी उपयुक्त विविध पुस्तके ग्रंथालयास भेट स्वरूपात देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या बद्दल प्रा.रविंद्र माळी व सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यानी प्राचार्य प्रा.डाॅ. माळी यांचे आभार मानले. कार्यक्रमास  प्रा.देवेश प्र. भावसार, प्रा. प्रफुल्ल चव्हाण, प्रा. प्रितम पाटील, प्रा.सतिश ब्राम्हणे, प्रा. छाया महाजन, प्रा. स्वप्नाली महाजन, प्रा. गीतांजली पाटील, प्रा. वर्षा पाटील, प्रा. प्रियंका महाजन, कविता शिंपी  त्याचप्रमाणे अनिल महाजन, ज्ञानेश्वर चौधरी, जितेंद्र पाटील, शिवाजी पाटील, विनय ब्रम्हे, प्रकाश पाटील उपस्थित होते. सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ. संदेश बी. गुजराथी फार्मसी विभागाचे चेअरमन योगेश मुंदडे, खा.शि.मंडळाचे चिटणीस प्रा.पराग पी. पाटील,  प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी. जैन, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.रविंद्र सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या.

 

श्री स्वामी समर्थ मंदिरात उसळली भाविकांची गर्दी

 

अमळनेर येथील श्री स्वामी समर्थ आधात्मिक केंद्रात गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु करण्यासाठी मोठ्या संख्येने सेवेकरी उपस्थित होते. दर्शनासाठी यावेळी महिला व पुरुष भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्री स्वामी समर्थ आधात्मिक केंद्रात गुरुपौर्णिमेच्यानिमित्ताने जिवन श्री ब्लड बँक, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने  रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी पुरुष व महिला सेवेकऱ्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून गुरुचरणी सेवा अर्पित केली. दिवसभरात सेवा केंद्रात सुमारे सहा हजार भाविकांनी महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला.

 

स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल

 

अमळनेर येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम झाला. प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी गुरु द्रोणाचार्य, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल व सहदेव यांची भूमिका साकारून छोटाश्या नाटकाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुचे महत्त्व पटवून दिले. गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते तसेच आपले आई-वडील हेच आपले पहिले गुरु आहेत हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषणातून सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. मुख्याध्यापक श्री विनोद अमृतकर यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट कार्यक्रम सादर केल्याबद्दल कौतुक केले.

 

मानव केंद्रात कार्यक्रम

 

अमळनेर येथील मानव केंद्रात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. येथे सकाळपासूनच शहर व खेड्यावरील सत्संगी बंधू व भगिनी मोठ्या प्रमाणात  दाखल झाले होते. सकाळी ९ ते ११  भजन कार्यक्रम झाला. केंद्राचे मौजुदा गुरुदेव संत बलजीतसिंह महाराज यांनी प्रोजेक्टर द्वारे उपस्थित संगतला संबोधित केले. आपल्या भारतात गुरुपरंपरा हजारो वर्षांपासून चालत आली असून गुरु व शिष्याचे पवित्र नाते या जगतात आजच्या घडीला खूपच प्रेरणादायी आहे. शिष्याचा गुरुप्रति समर्पण भाव या संसाररूपी भवसागरातून  शिष्याला नक्कीच तारतो. गुरुजी पुढे म्हणाले की, साधकाने मनावर नियंत्रण ठेऊन भक्तिमार्गात  पुढे चालत राहिले पाहिजे. सर्व प्रणि्मात्रांमध्ये एकच परमेश्वराचा वास आहे म्हणून सगळ्यांवर दया करा, असा संदेश यावेळेस दिला. या वेळी १० भावीकांनी गुरुदिक्षा घेतली. तसेच खासदार  स्मिताताई वाघ यांनी मानव केंद्राला भेट दिली व केंद्राकडून होत असलेल्या समाजसेवा  कार्याबद्दल स्थानिक प्रबंधक समितीचे कौतुक केले. या वेळी खासदारांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन समितीने सत्कार केला. त्यांनंतर संगतला महाप्रसाद वाटप झाला. यावेळी जवळपास तीन हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी स्थानिक प्रबंधक कमेटीचे सेवेदार योगेश कुमावत, राजेश सोनार, आनंदा पाटील, दीपक सोनार, योगेश सोनार, अविनाश कुमावत, समाधान पाटील तळवाडे, नंदू पाटील तळवाडे, विजय पितांबर पाटील, रवींद्र बोरसे, गिरीधर बापू , पप्पू कासार, गयबू सनपुलेकर, मुकेश, बिरजू भाऊ, चेतन वानखेडे मांडळ,  कौतिक बापू मांडळ, सुनील पाटील मुडी, नानाभाऊ कुंभार, लोटन महाजन लोण, जगदीश रोटवद, भास्कर कुमावत नांद्री, प्रवीण पेंटर, नाना भोई, वसंत बागुल, प्रल्हाद भावसार, दिलीप मिस्त्री, श्रीरामभाऊ, उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *