अमळनेर (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ अमळनेर आणि धन्वंतरी आयुर्वेद शिक्षण संशोधन संस्था, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने 13 जुलै रोजी मोफत आयुर्वेदिक निदान पंचकर्म शिबीराचे आयोजन अमळनेर शहरात करण्यात आले आहे.
धुळे येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. प्रविण जोशी यांच्या मार्गदर्शनात बन्सीलाल पॅलेस, प्रताप मिल अमळनेर येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत हे शिबिर होणार आहे. या शिबिरात मुतखडा, आमवात, संधिवात, अम्लपित्त, थायरॉईड, उच्च रक्तदाब, मधुमेह, बद्धकोष्ठता, मुळव्याध, मान, पाठ, कंबर दुखणे, अपचन, धाप लागणे, सर्दी, खोकला, स्त्रियांचे विकार (पाळीच्या तक्रारी व अनियमितता), निद्रानाश, अंगाची खाज, हातापायांना भेगा पडणे. त्वचेचे विकार, चेहऱ्यावरील डाग-मुरुम, केस गळणे, अकाळी केस पांढरे होणे, डोकेदुखी इत्यादी आजारांवर उपचार होणार असून शिबीरामध्ये 7 दिवसाची औषधी व 1 दिवसाचे पंचकर्म मोफत केले जाईल. शिबीराची नांव नोंदणी डॉ. सुमित पाटील (व्हेटरनरी) अमळनेर अविनाश मेडीकल, अमळनेर, अरिहंत मेडीकल, अमळनेर, बजरंग सुपर मार्केट, अमळनेर व पतंजली आरोग्य केंद्र, अमळनेर येथे करावयाची आहे. शिबिराचे संयोजक आयुर्वेदाचार्य डॉ. रुचिता वैभव कोठेकर (पाटील) व डॉ. वैभव शिवाजीराव कोठेकर (पाटील), बीड हे असून अमळनेर परिसरातील रुग्णांनी या आयुर्वेदिक शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी प्रेसिडेंट देवेंद्र कोठारी, सेक्रेटरी आशिष चौधरी व प्रोजेक्ट चेअरमन धिरज अग्रवाल यांनी केले आहे. दरम्यान या शिबिरात येणारे पहिले 200 पेशंटची तपासणी होईल.