अमळनेर (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या संयुक्तपणे बाजार समितीत स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
आंतरराष्ट्रीय सहकार २०२५ तसेच राज्य कामगार कल्याण मंडळा महाराष्ट्र सर्वेक्षण २०४७ अंतर्गत हे अभियान राबवण्यात आले.
राज्य शासनाने महाराष्ट्र सर्वेक्षण २०४७ साठी राज्य कामगार कल्याण मंडळातर्फे महाराष्ट्र राज्य २०४७ मधे कसे असावे याबाबत लोकांमध्ये जागृतता आणून, याबाबतीत लोकांचे अभिप्राय, लोकांच्या समस्या व अपेक्षित योजना याबद्दलची माहिती याप्रसंगी देण्यात आली. यावेळी बाजार समितीचे उपसभापती सुरेश पाटील,संचालक सुभाष पाटील,शरद पाटील,पुष्पा पाटील,सहाय्यक निबंधक कुणाल सोनार,राज्य कामगार कल्याण मंडळ अधिकारी व्ही.एम.जगताप, अजय अहिरे,राकेश चौधरी,बाजार समितीचे सचिव उमेश राठोड, सहसचिव सुनील सोनवणे, अशोक वाघ,लेखापाल योगेश महाजन, वरिष्ठ लिपिक गणेश पाटील,दिगंबर पाटील, व इतर कर्मचारी व हमाल मापाडी बंधाव यावेळी उपस्थित होते.