अमळनेर तालुक्यातील मालपुर येथील ग्रामपंचायतीची निवडणूक मोठी चुरशीची झाली त्याठिकाणी लोकनियुक्त सरपंच तसेच सात सदस्य म्हणून आपले गाव आपले पॅनलच्या सर्व सदस्यांना निवडून आणण्यात अमळनेर बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रफुल पवार यांनी पुन्हा पाच वर्षे सत्ता राखण्याची मोठी बाजी मारून लोकनियुक्त सरपंच म्हणून सुमनबाई पंढरीनाथ व सदस्य म्हणून प्रफुल्ल हिरालाल पवार ,सचिन भिमराव पवार, जतन बाई दशरथ पाटील ,उज्वला बाई प्रवीण पाटील ,रेखाबाई संजय पाटील ,दमयंताबाई यशवंत पाटील, रोहिदास भगवान भिल, या सर्व सरपंचसह सदस्यांनी मोठ्या मताने विजय खेचुन आणला या त्याठिकाणी विजयाचे प्रेरणास्थान म्हणून विधान परिषदेचा आमदार स्मिताताई वाघ व भाजपचे जिल्हाध्यक्ष उदयजी वाघ यांचे मोठे योगदान लाभले असुन प्रफुल्ल पवार यांनी मागील दहा वर्षापासून गावात अनेक विकास कामे केली त्याचा त्यांना निवडणुकीत मोठा फायदा झाला प्रफुल पवार यांच्यावर गावकऱ्यांनी मोठा विश्वास टाकून त्यांच्या एक हाती संपूर्ण ग्रामपंचायती सत्ता ताब्यात दिली असून त्यांच्या निवडीबद्दल गावकऱ्यांनी तसेच परिसरातील अनेकांनी त्यांचे स्वागत केले निवडीप्रसंगी जी प माजी सदस्य ऑड व्ही आर पाटील प स सदस्य भिकेश पाटील प स माजी सभापती शाम आहिरे ,ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र बोरसे, पाडळसे माजी सरपंच सचिन पाटील आदींनी त्यांचे स्वागत केले.