अधिकारी कर्मचाऱ्यांचे हाल..
अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणुकीची ऐसी तैसी असा प्रकार अमळनेर तालुक्यातील १० ग्रामपंचायत निवडणुकांची झाली आहे मतदान साहित्य पाठवण्यासाठी निवडणूक शाखेला साधी खाजगी स्वतंत्र वाहने देखील सापडली नाहीत त्यामुळे सापडेल त्या वाहनात गेल्या मतदान पेट्या अधिकारी रवाना झाल्यामुळे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हाल झाले यामुळे नको रे बाबा निवडणूक ड्युटी असे म्हणण्याची वेळ आली आहे.
कर्मचारी सह मतपेट्या अवैध वाहतुकीने कळस गाठलेला दिसून आला. वाहनांमध्ये अक्षरश: लोक कोंबून भरलेले घेऊन जात असतांना ही वाहतूक पोलिसांच्या देखत होतांना दिसत आहे.
तालुक्याच्या इतिहासात अशी वेळ प्रथम आली असून चक्क माल वजा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वापर करावा लागला ही बाब निवडणुकीच्या दृष्टीने गंभीर आहे.