अमळनेर(प्रतिनिधी) जळगांव लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा सामना रंगत असतांना आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील भाजपाला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस चे सचिन पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांवर आचार संहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
निम्न तापी प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आदर्श आचार संहिता भंग झाला असून तक्रारीची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे
लोकसभा निवडणुकीची आचार संहिता १० मार्च पासून लागू झाली आहे तरी निम्न तापी प्रकल्प विभागाचे अधिकाऱ्यांनी १६ मार्च ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह साजरा केला कार्यक्रमाचे आयोजन हे निम्न तापी प्रकल्पाचे अधिकारी अभियंता रजनी देशमुख , व्ही .पी .ठाकूर , डी सी पाटील एन बी शेलावे हे होते निमंत्रित मध्ये भाजप पक्षाचे पदाधिकारी ग्रंथालय चे प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र बोरसे , व भाजप पक्षाचे माजी जि प सदस्य संदीप पाटील होते या कार्यक्रमामुळे भाजप पक्षाला जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात आला तरी
हा आचार संहितेचा भंग झाला असून, याबाबत सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून तत्काळ गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे म्हणून तक्रारीची चौकशी करून कार्यक्रमातील सहभागी आयोजक , निमंत्रक यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सचिन पाटील सह अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे.