वृक्षवल्ली परिवारा तर्फे महिलांची पर्यावरण पूर्वक रंगपंचमी साजरी

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील वृक्षवल्ली परिवारा तर्फे महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेली इको फ्रेंडली पर्यावरण पूर्वक रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी कोणतेही रासायनिक रंगाचा उपयोग न करता नैसर्गिक रंग वापरण्यात आले.तसेच अमळनेर येथील पाण्याचा दुर्भिक्ष्य असल्याने रंगपंचमी खेळताना पाण्याचा उपयोग करण्यात आला नाही. वृक्ष वल्ली परिवार नेहमी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित असतो .या परिवारातर्फे आज पर्यंत अनेक पर्यावरण संरक्षण,महिला हळदीकुंकू,पर्यावरण पूर्वक रंगपंचमी, वृक्ष लागवड इ उपक्रम राबविण्यात आले आहेत. आज रंगपंचमी देखील अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी वृक्ष वल्ली परिवाराच्या अध्यक्ष नीलिमा सोनकुसरे, अपेक्षा पवार,शीतल सावंत ,प्रा जयश्री साळुंके,सुरय्या शेख, योगिता पांडे,माधुरी पाटील,विद्या हजारे,राजश्री पाटील,अर्चना आठवले,राधा नेटले,निशा दुसाने,नेहा देशपांडे,उज्वला पाटील,रुपाली शिरोडे,शकुंतला वाणी, चैताली वैद्य इ उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *