वावडे आणि बिलखेडा येथे ट्रॅक्टर पकडले
अमळनेर (प्रतिनिधी) अवैध वाळू वाहतूक संदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच अखेर जाग येऊन कर्तव्यदक्ष तहसीलदार व त्यांच्या महसूल पथकाने बऱ्याच काळानंतर वाळू माफियांवर कारवाईचा श्रीगणेशा केला. दोन ट्रॅक्टर पकडत धाडसी कामगिरी केली आहे. या धडक कारवाईची चर्चा पूर्ण तालुकाभर रंगली आहे.
तालुक्यातील बिलखेडा व वावडे येथे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे तसेच तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत गौण खनिज वाळू वाहतूक करणारे एक ट्रैक्टर आढळल्याने ते पकडण्यात आले. सदर ट्रॅक्टर मुद्देमालासह अमळनेर तहसिल कार्यालय येथे जमा करण्यात आले. या पथकात तहसीलदार व नऊ तलाठ्यांचा समावेश होता. सर्व पथकाने रात्रभर जागरण करून कारवाई केल्याबद्दल तहसीलदारांचे व पथकाच्या निरपेक्ष कारवाईचे विविध मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले.
चार पकडले, तीन सोडले आणि एकालाच आणण्याची पसरवली खोटी अफवा
महसूल विभागाने केलेल्या कारवाईचे कौतुक न करता आल्याने काहींनी तालुकाभर विविध अफवा पसरवणे सुरू केले असून दादू, बाळू आणि सोनूकडे मंथली पास असल्याने त्यांची पकडलेली तीन वाहने सोडल्याची खोटी अफवा पसरवण्यात आली आहे. रात्रभर वाळू वाहणाऱ्या शेकडो वाहनांमधून एक ट्रॅक्टर पकडून धाडसी कामगिरी करणाऱ्या पथकाचे कौतुक करणे अपेक्षित असताना विविध अफवा पसरवण्यात काही असंतुष्ट लोक धन्यता मानत आहेत. महसुलाच्या पथकाने याकडे लक्ष न देणे आपली कारवाईची गती अशीच कायम ठेवावी, अशी मागणी सिस्टिममधल्या मान्यवरांनी केली आहे.
वावडे आणि बिलखेडा येथे कारवाई
अमळनेर तालुक्यातील वावडे आणि बिलखेडा अवैध वाळू वाहतूक करणारी दोन ट्रॅक्टर पकडून महसूल विभागाने कारवाई केली.उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे तसेच तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली एक अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारे ट्रैक्टर आढळल्याने ते पकडण्यात आले. हे ट्रॅक्टर मुद्देमालासह तहसिल कार्यालय येथे जमा करण्यात आले. पथकात पी. एस. पाटील (मंडळ अधिकारी वावडे भाग), एम आर पाटील (ग्राम महसूल अधिकारी मांडळ), संदीप माळी (ग्राम महसूल अधिकारी), अमोल चक्रे (ग्राम महसूल अधिकारी जवखेड़े), भुषण पाटील (ग्राम महसूल अधिकारी बोहरा), जितेंद्र पाटील (ग्राम महसूल अधिकारी शिरसाले बु), कल्पेश कुँवर (ग्राम महसूल अधिकारी रणाईचे), विकेश भोई (ग्राम महसूल अधिकारी) हे होते. तर बिलखेडा येथेही कारवाई करण्यात आली. पथकात ग्राम महसूल अधिकारी अभिमान जाधव (कान्हेरे), सुधीर पाटील (गडखांब ), प्रसाद पाटील (मंगरूळ), विकेश भोई (बामणे), अमोल पाटील (कुऱ्हे), पवनकुमार शिनगारे (सावखेडा), आकाश गिरी (पाटोंडा), संदीप माळी (मांडल), राजेंद्र केदार (कुऱ्हे) हे पथकात होते.