अमळनेर (प्रतिनिधी) उत्कर्ष एक सामाजिक फाऊंडेशन बदलापूरतर्फे गांधलीपुरा येथील श्री.आबासो अनिल अंबर पाटील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
उत्कर्ष एक सामाजिक फाउंडेशन ही लोकसहभागातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप, दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांना नवीन कपडे, बूट, मिठाईचे वाटप करून अनेक शैक्षणिक उपक्रम वर्षभर राबवत असते. त्यानुसार शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना दप्तर,वही सेट,चित्रकला वही, पेन-पेन्सिल,पाणी बॉटल, तसेच सचित्र बालमित्र असा संपूर्ण सेटचे मोफत वाटप करण्यात आले. या वेळी फाउंडेशनचे योगेश्वर पाटील, दीपक भोई, किरण पाटील, दिवाकर बोरसे, शाळेचे मुख्याध्यापक अमोल पाटील, ज्ञानेश्वर भदाणे, भरत पाटील, प्रशांत कापडणे, प्रदीप सैंदाणे, संदीप पाटील, प्रेमराज भोई, संदीप भोई आदी उपस्थित होते.