विना परवाना बैलांची कोंबून वाहतूक, पोलिसांत गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) चोपडा येथील गोरक्षकांनी विना परवाना बैलांची कोंबून वाहतूक करणाऱ्या बेटावद येथील एकाला वाहनासह तालुक्यातील झाडी येथे  पकडून दोन बैलांची सुटका केली. एक बैल घेऊन मात्र आरोपी फरार झाला आहे. ही घटना १७ रोजी सकाळी पाच वाजता घडली.

   याबाबत अधिक माहिती अशी की, संग्राम शामसिंग परदेशी (रा. हरेश्वर कॉलनी चोपडा) हे गोरक्षक अमळनेरहून बेटावदकडे मोटरसायकलने जात असताना त्यांना झाडी गावाजवळ सकाळी ६ वाजता पिकअप वाहन (क्रमांक एम एच ४१ , जि २६६०) येताना दिसली. त्यात तीन बैल दाटीवाटीने कोंबलेले दिसून आले. परदेशी यांनी वाहन थांबवून त्याला परवाना विचारला असता परवाना नव्हता. त्याने त्याचे नाव मुस्तफा करीम कुरेशी (रा बेटावद ता. शिंदखेडा) असल्याचे सांगितले. हे गुरे त्याने शिंदखेडा येथून आणल्याचे सांगितले. गोरक्षकांनी त्यातील दोन बैलांची सुटका करून झाडी गावात उतरवले. तोपर्यंत मुस्तफा पिकअप वाहन आणि त्यातील एक बैल घेऊन पळून गेला. परदेशी यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून मुस्तफा विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० च्या कलम ११(१)ड ,फ प्राणी परिवहन नियम कलम ४८,४९,५६ (क) , महाराष्ट्र पोलीस अधिनोयं कलम ११९, ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात लसूण तपास  हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *