अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील खापरखेडा प्र.डा.येथे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. 17 रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सुरेश देवाजी भिल (वय 45 ) याने आपल्या गावी राहत्या घरी घराच्या छताला गळफास घेतला. ही घटना लागलीच निदर्शनास आल्याने त्यास बेशुद्ध अवस्थेत खाजगी वाहनात टाकून अमळनेर ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्यात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. याबाबत अनिल सोनवणे यांनी मारवड पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ.संजय सूर्यवंशी हे करीत आहेत.