अमळनेर (प्रतिनिधी) तालुका राष्ट्रवादी काँग्रेसशरदचंद्र पवार पक्षाची बैठक झाली. यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक आणि पक्षवाढी संदर्भात चर्चा करण्यात आली.
आमदार डॉ.बी.एस पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक आणि पक्षवाढी संदर्भात डॉ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या बैठकीस ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, मनोहर निकम, कमल आक्का, अनंत निकम, ॲड. शकील काझी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सुरवातीला प्रास्ताविक तालुका अध्यक्ष डी.एम पाटील यांनी तर सूत्रसंचालन डी.ए. पाटील केले. आभार शहराध्यक्ष प्रशांत निकम यांनी मानले.