अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक जमातीच्या वतीने ५ फेब्रुवारी रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या नियोजन संदर्भात सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित समाजबांधवांनी विवाह सोहळ्यासाठी लागणारी आर्थिक मदत देखील जमा केली. अमळनेरचे अध्यक्ष मुक्तार खाटीक, इम्रान खाटीक, अनिस खाटीक, जाकीर खाटीक, आरिफ खाटीक, नूरजमाल खाटीक,अजीज खाटीक, अब्बास खाटीक, सुपडू हाजी, हाजी इसा खाटीक, हाजी हमीद जनाब, जावेद, सत्तार हाजी, जिना शेठ आदींसह शहरातील तसेच ग्रामीण भागातील समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.