घरच्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी मोटर सुरू करताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) नवीन घरच्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी विद्युत मोटर सुरू करताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १३ रोजी तालुक्यातील पिंगळवाडे येथे दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,   तालुक्यातील पिंगळवाडे येथील सचिन मनोहर पाटील (वय २८) हा १३ रोजी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास नळाला पाणी आल्याने नवीन घरच्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी गेला. मात्र मोटर सुरू करताच विजेचा झटका लागून तो फेकला गेला. त्याचा आवाज आल्याने आजूबाजूचे लोकांनी पाहिले असता तो जमिनीवर पडलेला होता. त्याच्या डाव्या हातात मोटरची वायर होती. लोकांनी विजेचा प्रवाह बंद करत त्याला उचलून खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. साहेबराव निंबा पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुनील पाटील हे करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *