पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत रवानगी

अमळनेर (प्रतिनिधी)तालुक्यातील मांडळ येथील विवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या पती व सासू याना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सूनावल्याने आरोपीना जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले आहे
१५ रोजी मांडळ येथील विवाहित सोनाली राजू कांबळे हिने दुपारी २ वाजेच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर छताला दोरी बांधून आत्महत्या केली होती तिची आई आशाबाई अनिल म्हस्के हिने मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की पती राजू हिरामण कांबळे, व सासू कमलाबाई कांबळे यांनी राजू चे बी.एच.एम.एस.चे शिक्षण पूर्ण होत नसून दवाखाण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये आणि मुलबाळ होत नाही म्हणून मानसिक त्रास दिला होता. यावरून मारवड पोलिसात पती व सासू यांच्या विरुद्ध भादवी ३०६, ५०४, ३४ प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सूनावल्यानंतर त्यांना जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *