रोटरी क्लब अमळनेरतर्फे व्याक्तीमत्व विकास व जिवन शिक्षणावर कार्यशाळा

अमळनेर (प्रतिनिधी) रोटरी क्लब अमळनेरतर्फे युथ लीडरशिप अवॉर्ड्स अंतर्गत “व्याक्तीमत्व विकास व जिवन शिक्षण” कार्यशाळा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी  घेण्यात आली.

रोटरी हाॅल येथे रविवारी झालेल्या या कार्यशाळेचे उदघाट्न प्रदिप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.  यात मुलांना “व्याक्तीमत्व विकास व जिवन शिक्षण” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी साधन व्यक्ती म्हणून नासिकचे ख्यातनाम प्रा.ललित खैरनार हे आले होते. या कार्यशाळेसाठी अमळनेर येथील 10 वीच्या वर्गातील 135 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवुन व्याक्तीमत्व विकास व जिवन शिक्षणावर सहभाग पध्दतीने व बौद्धिक खेळातून जिवन शिक्षणाचे धडे गिरवले. जसे “कुछ पाने केलीये, कुछ ज्यादा करना पडता है”.  विषेश या कार्यशाळेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांस रोटरी क्लब अमळनेर व रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या संयुक्त प्रोजेक्ट ज्यात आयडियल स्टडी मुंबई मार्फत तयार केलेले 10 वी अभ्यासक्रमाची आधारीत स्टडी बडी अँप ज्याची बाजार मुल्या 1500 रुपये आहे ते स्वागत मुल्य15 रुपयात मिळणार आहे. रोटरी क्लब अमळनेर मागील सलग पाच वर्षापासुन हि कार्यशाळा घेत आहे. प्रमुख पाहुणे मितेश गोसलीया व लालचंद सैनानी यांनी जिवन शिक्षण किती महत्वाचे आहे हे त्याच्या भाषणातुन समजावून सांगीतले. समारोप प्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांनी शिबिराबाबत मनोगत व्यक्त केली. या वेळी रोटरीचे विशाल शर्मा, सेक्रेटरी रोहीत सिंघवी, अविनाश अमृतकर या कार्यक्रमाच्या नियोजनात सहभागी होते. सुत्रसंचलन प्रतिक जैन व किर्तीकुमार कोठारी यांनी केले. प्रेसिंडेंट ताहा बुकवाला यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *