अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शिवसेनातर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिसवानिमित्त ५ रोजी नेत्र तपासणी शिबिर झाले. या शिबिरात तालुक्यातील सुमारे १५० जणांनी लाभ घेतला. शिबिराचे उदघाट्न जिल्हाध्यक्ष वासुदेव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अमळनेर तालुक्यातील नेत्ररोगाने त्रस्त नागरिकांची निकड लक्षात घेता शिवसेना तालुका प्रमुख सुरेश पाटील व शहर प्रमुख संजय पाटील यांनी या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात सुरेश पाटील यांचे वडील अर्जुन डिगंबर पाटील व आई कमलबाई अर्जुन पाटील यांच्यासह सुमारे १५० गरजूंनी शिबिरात डोळ्यांची तपासणी करुन घेतली. कार्यक्रमाचे औचित्य साधून बसस्थानकाजवळच शिवसेना कार्यालयात जनतेच्या सेवेसाठी ऑनलाईन सेतू सुविधा केंद्राचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक विक्रांत पाटील, उपशहर प्रमुख प्रवीण पाटील, वैद्यकीय तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, उप तालुका प्रमुख संतोष पाटील, हेडावे माजी सरपंच रवींद्र पाटील यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शिवसेना कार्यकर्ते भूषण कोळी, अनिल पाटील, पोलिस पाटील विजय पाटील, अमित ललवाणी, शोयब शेख, उमाकांत चव्हाण, रितेश बोरसे यांचे सहकार्य लाभले.
रवि ज्वेलर्स अमळनेर
24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1050/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%