अमळनेर आगारात दाखल पाच नव्या बसेसचे थाटात लोकार्पण

अमळनेर (प्रतिनिधी)  येथील रा.प.म.एस टी आगाराला नवीन पाच बसेस उपलब्ध झाल्याने शनिवारी ७ जून रोजी सकाळी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते थाटात व वाजतगाजत लोकार्पण करण्यात आले. या वेळी मान्यवर आणि प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील, विनोद पाटील, आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी, आगार प्रमुख अनिकेत न्हायदे उपस्थित होते. या वेळी सजविण्यात आलेल्या पाचही नवीन बसेसचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. या वेळी मनोगत व्यक्त करताना आमदार पाटील म्हणाले की विद्यार्थी आणि प्रवाश्यांच्या सोईसाठी अमळनेर आगाराला एकूण २५ नवीन बसेसची मागणी आपण केली असून त्यापैकी दहा मंजूर झाल्या आहेत.आज प्रत्यक्ष ५ प्राप्तही झाल्या असून ५ लवकरच उपलब्ध होतील. याशिवाय अमळनेर आगारासाठी मंजूर झालेल्या ९ कोटी निधीतुन अर्ध्या स्थानकाचे नूतनीकरण काम जोमाने सुरू झाले आहे. लवकरच उर्वरित स्थानकाच्या कामासाठी देखील निधी मिळवून अमळनेर बस स्थानक मॉडेल स्थानक बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री अनमोल सहकार्य करीत  आहे, असे आमदारांनी सांगितले. या नवीन पाच बसेस उपलब्ध झाल्याने लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर होणार आहे. त्याचप्रमाणे बसेस अभावी काही फेऱ्या बंद झाल्या होत्या.  त्या फेऱ्या पुन्हा सुरू होऊन विद्यार्थी , नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.यासाठी आमदार अनिल पाटील यांनी यशस्वी पाठपुरावा केल्याने प्रवाश्यांनी आभार व्यक्त केले. यावेळी एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी एलटी पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, अर्बन बँक संचालक प्रविण जैन, भास्कर बोरसे, महेंद्र पाटील, प्रा. सुनिल पाटील यासह एस टी महामंडळचे प्रमोद बाविस्कर, विजय वाडेकर, पूनम जाधव,तुषार साळुंखे, मुकेश सैदाने, सतीश सातपुते, संदीप साळी, मनोज पाटील, दर्शन सोमवंशी, निलेश कंखरे, धनगर, अहिरे, नितीन पाटील, चंदू बोरसे, संजय मोरे, गजानन सूर्यवंशी, नरहरी पाटील, युनियनचे सर्व पदाधिकारी यासह वाहक व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आमदारांनी स्वतः केला प्रवास

 

आमदार अनिल पाटील यांनी स्वतःबसमध्ये विराजमान होत डीजेच्या तालावर या पाचही बस वाजतगाजत धुळे रस्त्यावरून  बस स्थानकात आणण्यात आल्या. त्यांच्यासोबत पत्रकार बांधव, एसटीचे अधिकारी, राजकीय पदाधिकारी व कार्यकर्तेही विराजमान झाले होते. या बस रॅली कडे साऱ्यांचेच लक्ष वेधले गेले होते. आपल्या हक्काची लालपरी आता नव्या रुपात येत असून सुरक्षित प्रवास म्हणून जास्तीतजास्त नागरिकांनी बस ने सुखर प्रवास करावा असाच संदेश आमदारांनी यानिमित्ताने दिला. एवढेच नव्हे तर आमदारांनी स्थानकात स्वतः स्टेरिंग हातात घेऊन चालक व वाहकांचा उत्साह देखील वाढवला.

रवि ज्वेलर्स अमळनेर

24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1050/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *