अमळनेर (प्रतिनिधी) मोदींच्या नेतृत्वात पाकिस्तानाला धडा शिकवण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ सर्वांनी अनुभवले. तर माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी आपल्या शेतात “सिंदूर” रोपांची यशस्वी लागवड करून 15 महिन्यातच यशस्वी “सिंदूर”चे उत्पादन घेतले. हा “सिंदूर” धार्मिक विधीसाठीही उपयुक्त असून बाजारातील रासायनिक कुंकूपेक्षा तो अधिक सुरक्षित आणि शुद्ध असल्याने हा नवा प्रयोग जिल्ह्यात चांगलाच चर्चेत आला आहे.
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी राजवड (आदर्शगांव) येथील “राज” फार्मवर 15 ऑगस्ट, 2023 रोजी 35 “सिंदूर” रोपांची यशस्वी लागवड केली आहे. साधारणपणे “सिंदूर” चे उत्पादन हाती येण्यासाठी लागवडीच्या दिवसापासून 3 वर्षाचा कालावधी जावा लागतो. कृषीक्षेत्रात योजनाबद्ध शेती कामात बहुमोल कार्य केल्यामुळे लागवड केल्यापासून अवघ्या 15 महिन्यातच प्रती वृक्ष 1 किलोप्रमाणे 35 किलो “सिंदूर”चे प्रथम उत्पादन घेण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे. या “सिंदूर” झाडावर लालसर रंगाची फळे (गुच्छ) येतात. ही फळे कोरडी झाल्यावर बिया काढल्या जातात. या बिया नैसर्गिकरीत्या गळद लालसर रंगाच्या असतात. या बियांमध्ये नैसर्गिक रंगद्रव्य असते, जे सुरक्षित असते. या बियांना सावलीत सुकवून तद्नंतर बारीक दळून लालसर पावडर तयार केले जाते. हेच पावडर नैसर्गिक कुंकू म्हणून वापरले जाते.
“सिंदूर” सौभाग्याच लेणं
या “सिंदूर चा उपयोग” हिंदू संस्कृतीत महिलांसाठी मांग भरणीसाठी (सौभाग्य लेणं) सिंदूर वापरले जाते. नैसर्गिक खाद्य रंग म्हणून पदार्थ रंगविण्यासाठीही या ‘सिंदूर’चा वापर केला जातो. त्वचेसाठी उपयुक्त असल्यामुळे औषधी आणि सौंदर्य प्रसादनातही वापर होतो. धार्मिक विधीसाठीही उपयुक्त असून हे कुंकू बाजारातील रासायनिक कुंकूपेक्षा अधिक सुरक्षित आणि शुद्ध असते. त्यामुळे हा प्रयोग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवी दिशा देणारा ठरणार आहे.
रवि ज्वेलर्स अमळनेर
24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1050/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%