कोणत्याही दाखल्याचे जादा पैसे मागत असतील तर नागरिकांनी संपर्क साधवा – तहसिलदार ज्योती देवरे

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरात भूमी अभिलेख कार्यालयाच्या बाहेर बेकायदेशीर रित्या स्टॅम्प वेंडरचे काम करून नागरिकांची लुबाडणूक करणाऱ्या पती पत्नी विरुद्ध तहसीलदार ज्योती देवरे यांनी पोलिसात कारवाई करण्याचे पत्र दिले आहे.
भूमिअभिलेख कार्यालयाच्या गटारीवर ठाण मांडून अर्जुन भिका पाटील व त्यांच्या पत्नी क्रांती अर्जुन पाटील हे दोघे साधा अर्ज भरून देण्यासाठी ७५ रुपये घेतात व जादा पैसे का घेतात अशी विचारणा केली असता तुमच्यावर केस करेल अशी धमकी देतात अशी लेखी तक्रार हिरालाल केशव पाटील यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे केली तहसीलदारांनी त्यांना बोलावून पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे लेखी पत्र पोलिसांना दिले आहे
दरम्यान विविध दाखले काढण्यासाठी दलालांचे प्रमाण वाढले असून कोणत्याही दाखल्याची जादा पैसे मागत असतील तर नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे