धरण संघर्ष समिती तर्फे मा.आ.चिमणराव पाटील यांची तापी पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार…

अमळनेर( प्रतिनिधी)येथिल पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समिती तर्फे मा.आ.चिमणराव पाटील यांचा तापी पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
पाडळसरे धरणाचे काम भरघोस निधी मिळून शीघ्र गतीने पूर्ण व्हावे या मागणीसाठी उभारण्यात आलेल्या जनआंदोलनात विशेष म्हणजे मा.आ.चिमणराव पाटील यांनी उपस्थिती देऊन पाठिंबा दिला होता.योगायोगाने तापी पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्ष पदी मा.आ.चिमणराव पाटील यांचीच निवड झाल्याने समितीतर्फे आनंद व्यक्त करण्यात आला.’पाडळसरे धरण झालेच पाहिजे!’ अश्या घोषणा देत समितीतर्फे पारोळा येथे मा.आ.चिमणराव पाटिल यांचा भव्य सत्कार करण्यात आला. तापी पाटबंधारे महामंडळाच्या माध्यमातूनही अमळनेर सह सहा तालुक्यांना संजीवनी ठरणाऱ्या धरणाच्या कामास गती मिळणेसाठी व समितीच्या मागण्यां पूर्ण करण्यासाठी मा.आ.चिमणराव पाटील यांनी यापुढे पदाचा उपयोग करून पुढाकार घ्यावा अशी विनंती समितीचे पदाधिकारी यांनी सत्कार करतांना केली.तर प्राधान्याने पाडळसरे धरणाच्या कामाकडे लक्ष घालू.पदभार स्वीकारल्यांनतर लवकरच समितिसोबत सविस्तर चर्चा करू! असे सांगून मा.आ.चिमणराव पाटील यांनी समिती सदस्यांनां आश्वासित केले.
जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी, प्रा.शिवाजीराव पाटील, एस.एम.पाटील, रवि पाटील,महेश पाटील,रणजित शिंदे,प्रशांत भदाणे,रामराव पवार, प्रभाकर पाटील, पुरुषोत्तम शेटे, सतिष पाटील, सुपडू बैसाणे, आदिंसह अमळनेर शिवसेनेचे पदाधिकारी उपजिल्हा प्रमुख डॉ.राजेंद्र पिंगळे, तालुका प्रमुख विजय पाटील, नगरसेवक संजय कौतिक पाटील, मा.शहर प्रमुख नितीन निळे तसेच पारोळ्याचे चंद्रकांत पाटील, ईश्वर ठाकूर याप्रसंगी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *