अनिल भाईदास पाटील यांची मुंबई येथे शरद पवारांशी भेट

अमळनेरात लवकरच कार्यकर्त्यांची बैठक घेऊन काढली जाणार समजूत

अमळनेर-येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांची जेष्ठ नेते अरुंणभाई गुजराथी यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांचेसोबत भेट घडवून आणली.यावेळी राजकीय स्थितीबाबत तिघांमध्ये सविस्तर चर्चा घडून आली.
लोकसभा निवडणुकीतील अनिल पाटील यांच्या उमेदवारीबाबत अचानक फेरबदल झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला होता,तर काहीअंशी अनिल पाटील देखील व्यथित झाले होते,अश्या परिस्थितीत अरुण भाई गुजराथी यांनी पुढाकार घेऊन ही बैठक घडवून आणली.यावेळी लवकरच पक्षाच्या प्रदेश पातळीवरील जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अमळनेर येथे बैठक घेऊन कार्यकर्त्यांची समजूत काढली जाईल असे संकेत शरद पवार यांनी दिले.व कोणत्याही परिस्थितीत जळगाव मतदार संघात राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला पाहिजे यासाठी जोमाने कामाला लागावे पक्ष आपल्या पाठीशी आहे असेही खा पवार यांनी सांगितले.यावर अनिल पाटील यांनी देखील आपले आदेश हे आमच्यासाठी प्रमाण असून संपूर्ण ताकदीनिशी आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही खा.पवार यांना देत यापुढे सर्वाना विश्वासात घेऊन निर्णय व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक यांचीही उपस्थिती होती.याभेटीमुळे दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या उलट सुलट चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *