२० कोटींचा निधी,आ शिरीष चौधरींची आजोळ परिसरातील गावांना मोठी भेट

अमळनेर(प्रतिनिधी)येथील आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या जळोद ,अमळनेर ते पारोळा या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून डांबरीकरणा सोबतच 7 मिटर रुंदीचा हा रस्ता होत आहे, या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असताना अमळगाव हे आ चौधरी यांचे आजोळ असल्याने या रस्त्याचा प्रश्न त्यांनी प्राधान्याने मार्गी लावून आजोळसह आजोळ परिसरातील गावांना एक मोठी भेट दिल्याचे मानले जात आहे.
हे काम लवकरच पूर्णत्वास येणार असून यामुळे परिसरातील ग्रामस्थांची मोठी सोय होणार आहे,विशेष म्हणजे जळोद येथील तापी नदीवरील पुलामुळे या रस्त्यावरील वाहतूक वाढली असून व्यापाऱ्याच्या दृष्टीकोनातून चोपडा तालुक्यातील अनेक गावे देखील अमळनेर मार्केटशी जोडली गेली आहेत,मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या परिसरातील ग्रामस्थांचा संपर्क काहीअंशी कमी झाला होता तो या रस्त्यामुळे पुन्हा वाढून परिणामी मार्केट वृद्धिंगत होऊ शकणार आहे. आमदार शिरीष चौधरी यांनी या 27 किमी च्या रस्त्यासाठी 20 कोटींचा निधी मंजूर केला असून त्यातून हे काम होत आहे,आमदारांनी नुकतीच या कामाची पाहणी करून लवकर हे काम पूर्णत्वास आणण्याबाबत ठेकेदारास सूचना केल्या.
या कामांमुळे अमळनेर व पारोळा हे दोन रस्ते एकमेकांशी जोडले जाऊन मध्यप्रदेशात जाण्यासाठी चांगला शॉर्टकट मार्ग तयार होणार आहे.रस्त्याची पाहणी करताना आंमदारांसोबत गटनेते प्रवीण पाठक, माजी सरपंच राजेंद्र पाटील, नगरसेवक नरेंद्र चौधरी, बाळासाहेब सदांनशिव, पंकज चौधरी, सुनील भामरे,गुलाब आगळे, हेमंत चौधरी उपस्थित होते.