अमळनेर : जळगाव जिल्हा क्रीडा विभाग व अमळनेर तालुका क्रीडा समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील महेश माळी व संजय बोरसे यांना उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार देण्यात आला तसेच दोन उत्कृष्ट खेळाडू व दोन प्राथमिक व दोन माध्यमिक शाळांचा ही गौरव करण्यात आला.
पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल चे महेश माळी व शिरसाळे माध्यमिक विद्यालयाचे संजय बोरसे यांना २०१८-१९ चे उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. छत्रपती शिवाजी नाट्यगृहात झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थानी अमळनेर शहराच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील होत्या प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद आमदार स्मिता वाघ, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ प्रदीप तळवेलकर , भाजप जिल्हा अध्यक्ष उदय वाघ उपस्थित होते तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रताप महाविद्यालयाचा गणेश व्हलर व भरवस शाळेची विद्यर्थिनी रिया पाटील यांचा गौरव करण्यात आला तर उत्कृष्ट शाळा म्हणून प्रताप कनिष्ठ महाविद्यालय , विजयनाना आर्मी स्कूल तर प्राथमिक शाळेतून भगिनी मंडळ व ग्लोबल व्ह्यू स्कूल ची निवड करण्यात आली शिक्षक , खेळाडु, तसेच शाळांना स्मृती चिन्ह , प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रांत यश मिळवणाऱ्या खेळाडूंचाही सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमास तालुका क्रीडा समन्वयक सुनील वाघ , सचिव डी डी राजपूत , प्रा अमृत अग्रवाल , निलेश विसपुते , संजय पाटील , के यु बागुल , पी डी पाटील , आर एस सोनवणे मुख्याध्यापक एस डी देशमुख , विंचूरकर , क्रीडा शिक्षक , पालक , विद्यार्थी हजर होते